हा तर फक्त ट्रेलर आहे, आणखी थंडी वाढणार आहे. हाडं गोठवणारी बोचरी थंडी वाढणार असल्याचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवामान विभागाने देशातील हवामानाबाबत महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत, ज्यात महाराष्ट्रासाठी विशेष इशारा देण्यात आला आहे. एका बाजूला दक्षिण भारतात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम 5 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातही होऊ शकतो. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोक दरम्यान पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
advertisement
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या डिसेंबर या दोन दिवसांसाठी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये थंडीची लाट येणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आता थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
पुढील ७ दिवसांचे तापमान अंदाज
उत्तर-पश्चिम भारतात पुढील ४ दिवसांत रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तास तापमान स्थिर राहिल्यानंतर, त्यानंतरच्या तीन दिवसांत ते २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. ही थंडीची लाट प्रामुख्याने उत्तरेकडील वाऱ्यांमुळे येणार असून, राज्यातील किमान तापमान सरासरीपेक्षा खाली जाऊ शकते.
दक्षिण भारतात डिटवाहचा प्रभाव
मागील २४ तासांत तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 'दितवाह' चक्रीवादळामुळे मोठा पाऊस झाला आहे. काल हे वादळ कमजोर होऊन डिप डिप्रेशनमध्ये बदलले आहे. या प्रणालीमुळे आज उत्तर तटीय तमिळनाडू आणि तटीय आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
