TRENDING:

Gold Market: सोन्याची खदान नसूनही जळगावला का म्हटलं जातं सुवर्णनगरी? हे आहे ‘99’ टक्के खरं कारण

Last Updated:

Jalgaion Gold Market: जळगावची सुवर्णनगरी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात प्रसिद्ध आहे. तब्बल 160 वर्षांची परंपरा या सराफा बाजाराला लाभली आहे.

advertisement
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
advertisement

जळगाव: भारतात सोनं आणि सोन्याचे दागिने हे संस्कृतीशीच जोडले गेले आहेत. त्यामुळे सण-समारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमांच्या वेळी आवर्जून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. सोनं खरेदी म्हटलं की अनेकांची पसंती ही जळगावलाच असते. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतातून सोनं खरेदीसाठी लोक आवर्जून जळगावला येतात. पण यामागे नेमकं कारण काय आहे? याबाबतच आपण जळगावातील सराफा व्यावसायिक किरण खोंडे यांच्याकडून जाणून घेऊ.

advertisement

सोन्यासाठी जळगावच का?

सोन्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांमुळे आणि शुद्धतेमुळे जळगावची सोन्यासाठी विशेष ओळख आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात लोक सोने खरेदीसाठी मोठ्या संखने येत असतात. इथला सराफा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथील सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्‍वासर्हाता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातून ग्राहक सोनं खरेदीसाठी जळगावात येत असतात.

advertisement

Gold Rate: सोन्याची रेकॉर्ड ब्रेक उसळी, जळगावच्या सराफा बाजारावर संकट, नेमकं घडतंय काय?

जळगावची सुवर्णनगरी

जळगावला सुवर्णनगरी देखील म्हटले जाते. या बाजारपेठेला तब्बल 160 वर्षांची परंपरा आहे. 1864 मध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सने जळगावच्या सराफ बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर पुढील काळात ती मोठ्याप्रमाणात विस्तारत गेली. आजमितीस जळगाव शहरात सुमारे 160 हून अधिक सुवर्ण पेढ्या व सुवर्ण मॉल्स आहेत. तर जिल्ह्याची आकडेवारी 700 च्या वर पोहचली आहे, असे खोंडे सांगतात.

advertisement

शुद्धता आणि गुणवत्ता

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याची शुध्दता व गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच इथले दागिने हस्तकलेचा उत्तम नमुना असतात. याची शोभा सौंदर्याला आणखीन उजळून टाकत असते. या ठिकाणी तयार होणारे दागिने हे बंगाली कारागिरी प्रमाणे बनत असतात. बारीक नक्षी त्याला तंतोतंत असे शोभणारे हिरे आणि सोन्याची शुद्धता या मुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात रोज 100 किलो पेक्षा अधिक सोन्याची विक्री होते, असंही व्यावसायिक सांगतात.

advertisement

ब्रिटिशकाळापासून ओळख

खानदेशचा प्रदेश हा ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासूनच सुपीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने झाला. त्यामुळे ब्रिटिश काळात इथल्या लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आणि त्यामुळे इथं सुवर्ण बाजारपेठ स्थिरावल्याचं सांगितलं जातं. जळगावात शोरूम संस्कृतीची मुहूर्तमेढ आर. सी. बाफना या फर्मने रोवली. त्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेश मधून देखील अनेक सोनं खरेदीसाठी इथे येऊ लागले, असं खोंडे सांगतात.

इथं दागिने घडवले जातात

जळगावात सोन्याचे दागिने घडविण्याचे काम तब्बल सहा ते सात हजार कारागीर करतात. त्यात गुजराती, बंगाली व राजस्थानी कारागीरांचा समावेश मोठा आहे. सोने-चांदी आखणी करणारे दीड हजार कारागीर आहेत. या बाजाराच्या माध्यमातून जवळपास दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्या हातची कारागिरी ही जळगावच्या सोन्यासोबत सातसमुद्रा पार पोचली आहे.

मराठी बातम्या/मनी/
Gold Market: सोन्याची खदान नसूनही जळगावला का म्हटलं जातं सुवर्णनगरी? हे आहे ‘99’ टक्के खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल