ठाणे - कोणतीही नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा याच उद्देशाने दोन तरुणांनी एक व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस आला आहे. आता या व्यवसायातून त्या दोघांची कमाई महिन्याला साधारण एक लाखाहून अधिक रुपये होत आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
डोंबिवलीकर असणाऱ्या 2 मराठी तरुणांनी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोघांनी एकमेकांच्या साथीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि सध्या त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस आला आहे. टू ब्रदर्स मिल्कशेक स्टुडिओ असे त्यांच्या या दुकानाचे नाव आहे. डोंबिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या घरडा सर्कल येथे पेंढारकर कॉलेजच्या अगदी समोर हे शॉप आहे.
advertisement
याठिकाणी तुम्हाला हवे असणारे मिल्कशेक, कॉफी, ज्यूस, फ्युजन ज्युसेस हे सगळे मिळेल. दोन मित्रांनी मिळून सुरू केलेला हा व्यवसाय आता चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. कोणतीही नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा याच उद्देशाने या दोघांनी हा व्यवसाय सुरू केला. जयेश पाटील आणि विशाल काठवले अशी यांची नाव असून डोंबिवलीत आता यांचे हे मिल्कशेक स्टुडिओ खूप प्रसिद्ध झाले आहे.
या मिल्क शेक स्टुडिओमध्ये तुम्हाला चॉकलेट मिल्क शेक, रोज मिल्कशेक, बटरस्कॉच मिल्कशेक, ब्ल्यूबेरी मिल्कशेक, हाईड अँड सिक मिल्क शेक, रसमलाई मिल्क शेक, किटकॅट मिल्कशेक, तू ब्रदर्स स्पेशल मिल्क शेक असे 10 हुन अधिक प्रकारचे मिल्कशेक उपलब्ध आहेत. असेच मोजीटोमध्ये लाईम अँड मिंट मोजितो, व्हर्जिनि मोजितो, स्पेशल पॅन मोजितो, मँगो मोजितो, ऑरेंज मोजितो असे दहा हुन अधिक मोजितो चे प्रकार सुद्धा उपलब्ध आहेत.
आजारी पडायचं नसेल तर भाजीपाला खरेदी करताना घ्या ही काळजी, नेमकं काय कराल?
या दोन्ही मित्रांचे बीकॉम मधून शिक्षण झाले असून शिक्षण झाल्यानंतर चार ते पाच वर्षे त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. एका कंपनीमध्ये काम करत असताना त्या दोघांची ओळख झाली आणि तिथूनच यांची मैत्री झाली. तेव्हाच या दोघांनी मिळून ठरवलं की आपण कोणता तरी व्यवसाय करावा. सुरुवातीला त्यांनी बदलापूर इथे शॉरमाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर काहीतरी वेगळं डोंबिवलीकरांना मिळावे, या उद्देशाने त्यांनी टू ब्रदर्स मिल्क शेक स्टुडिओला सुरुवात केली.
आता या व्यवसायातून त्या दोघांची कमाई महिन्याला साधारण एक लाखाहून अधिक रुपये होत आहे. 'कॉर्पोरेट क्षेत्रातला जॉब आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकत नाही याची जाणीव आम्हाला दोघांनाही झाली. परंतु असे असले तरीही आम्ही कोणताही निर्णय घाई घाई मध्ये घेतला नाही. दोन ते तीन वर्षे जॉब करून भांडवल जमा करून त्यानंतर आम्ही हा व्यवसाय सुरू केला,' असे विशाल काठवले यांनी सांगितले. त्यांचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
तर तुम्हालाही मिल्कशेक आणि मोजितोचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे असतील तर तुम्ही नक्की डोंबिवलीतील या टू ब्रदर्स मिल्क शेक स्टुडिओला भेट देऊ शकता.