विवाहित मित्राबरोबर गेल्यानंतर काय घडलं?
नाझनीन मोटारसायकलवर तिच्या मित्र हाफिज तनवर (वय 35) सोबत निघाली होती जो सेल्समन असून मालाडच्या एका परिसरात पत्नी आणि कुटुंबासह राहतो. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी ट्रक चालक सिकंदर पंडित याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
हाफिज फेब्रुवारी 2024 मध्ये अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील नेचर बास्केट शॉपमध्ये काम करत होता. त्याच काळात इंटर्न कोर्ससाठी आलेल्या नाझनीनशी त्याची ओळख झाली आणि मैत्री झाली. अपघाताच्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर नाझनीनने हाफिजला अंधेरी पूर्व येथे भेटायला बोलावले होते. दोघेही हाफिजच्या मोटारसायकलवरून आरे गार्डन आणि वर्सोवा परिसरात फिरले.
advertisement
रात्री नऊच्या सुमारास नाझनीनच्या कुटुंबीयांनी तिला घरी निघायला सांगितले होते त्यामुळे हाफिज तिला घरी सोडण्यासाठी मोटारसायकलने निघाला. दरम्यान वीरा देसाई रोडवर पोहोचल्यावर हाफिजने सिमेंट ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकने मोटारसायकलला धडक दिली आणि चाक नाझनीनच्या डोक्यावरून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
