TRENDING:

दुबईला जाण्याची गरज नाही, मुंबईत इथंच पाहा बुर्ज खलिफा अन् पाम आयलंड VIDEO

Last Updated:

दा या यात्रेमध्ये दुबई आणि लंडन या दोन देशांच्या झगमगत्या दुनियेचा संगम पाहायला मिळतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: थंडीचे दिवस आले की मुंबईकरांसाठी उत्सवमय वातावरण निर्माण होते. शहरातील वेगवेगळ्या भागांत मेळे, फेअर आणि यात्रा भरतात. अशाच वातावरणात बोरिवलीतील शिंपोली येथील प्रसिद्ध कोरा केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंदी यात्राचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी केंद्राकडून एखाद्या देशाची अथवा शहराची प्रतिकृती उभारली जाते. यंदा या यात्रेमध्ये दुबई आणि लंडन या दोन देशांच्या झगमगत्या दुनियेचा संगम पाहायला मिळतोय.

कारसारखे दरवाजे, पॉवर विंडो काचा अन् TV, Car लाजवले अशी रिक्षा, विदर्भाच्या राणीचा VIDEO

दुबईची चमकदार झलक

दुबई म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा आणि तीच प्रतिकृती इथे उभारली आहे. जवळपास 50 फूट उंचीचा मॉडेल रात्रीच्या प्रकाशात झळाळून उठतो. त्यासोबतच दुबई मॉल, पाम आयलंड आणि ग्लोबल व्हिलेजची सजावट इथल्या परिसरात पाहायला मिळते. रंगीबेरंगी लाईट्स, अरबिक डिझाईन्स आणि मृदू पार्श्वसंगीताने संपूर्ण वातावरण परदेशात असल्याचा अनुभव देतं.

advertisement

लंडनचा रॉयल लुक

दुसऱ्या बाजूला लंडनचं दर्शन देणारं कोपरा तयार करण्यात आलं आहे. इथे लंडन टॉवर, लंडन ब्रिज, बिग बेन, आणि ऑक्सफर्ड स्ट्रीटची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यावर पारंपरिक ब्रिटिश लाईटपोस्ट, लाल रंगाची प्रसिद्ध डबल डेकर बस आणि टेलिफोन बूथ या गोष्टींची सजावट केल्याने इथला प्रत्येक कोपरा फोटोसाठी परिपूर्ण बनलाय.

advertisement

फक्त 80 रुपयांत थ्रीडी प्रवास

प्रवेशासाठी फक्त 80 रुपये तिकीट असून, त्यामध्ये पर्यटकांना दोन्ही देशांच्या प्रतिकृतींचा अनुभव थ्रीडी मॉडेल्सच्या माध्यमातून घेता येणार आहे. मुलांसाठी विविध खेळ, फूड स्टॉल्स, आणि थंडीच्या हवेत गरम गरम खाद्यपदार्थांची मेजवानीही यामध्ये आहे. संध्याकाळी लाईव्ह म्युझिक, कलादर्शन आणि सेल्फी झोनमुळे परिसर पूर्णपणे यात्रेच्या वातावरणात रंगलेला दिसतो.

advertisement

परदेशात न जाता परदेशी सफर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

कोरा केंद्रात दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स उभारल्या जातात. कधी फ्रान्सचं आयफेल टॉवर, कधी इजिप्तचे पिरॅमिड्स, तर यंदा दुबई-लंडनचा मेळा. त्यामुळे मुंबईकरांसाठी हिवाळ्याच्या या दिवसांत परदेशात न जाता परदेशी सफर अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
दुबईला जाण्याची गरज नाही, मुंबईत इथंच पाहा बुर्ज खलिफा अन् पाम आयलंड VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल