TRENDING:

BMC Election 2025: मुंबई पालिकेच्या निवडणुकीत 'आम्ही गिरगावकर' संघटना उतरणार रिंगणात?

Last Updated:

गिरगावकरांच्या प्रश्नांसाठी गिरगावकरांनी स्थापन केलेल्या 'आम्ही गिरगावकर' संघटनेने थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सावंत, प्रतिनिधी
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ आता महापालिका निवडणुकीचंही वारं वाहू लागलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता  मराठी मतदारांचा बालेकिल्ला असलेल्या गिरगावात 'आम्ही गिरगावकर' संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

advertisement

आम्ही गिरगावर संघटनेत ८,२३२ सदस्य आहे.  भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघात 'आम्ही गिरगावकर' निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

गिरगावमध्ये आताच आरक्षण खालीलप्रमाणे 

- ११४ सरिता पाटील, भाजप (खुला)

- २१५ अरुंधती दुधवडकर, ठाकरे (अनुसूचित जाती)

- २१६ राजेंद्र नरवणकर, भाजप (OBC महिला)

- २१७ मीनल पटेल, भाजपा (खुला)

advertisement

- २१८ अनुराधा पोतदार, भाजप (खुला महिला)

- २२० अतुल शहा, भाजप (खुला महिला)

- २२१ आकाश पुरोहित, भाजप (खुला)

- २२२ रिटा मकवाना, भाजप (OBC)

मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गोरगावमध्ये २००९ साली पहिल्यांदा लोढा यांनी भाजपकडून निवडणूक लढवली, यामध्ये सेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. पण पुढच्या काही वर्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आता पूर्णपणे भाजपच प्रस्थ निर्माण झालं आहे. या सगळ्या भागात केवळ एकच ठाकरे गटाचा नगरसेवक आहे, इतर सगळे नगसेवक भाजपाचे निवडून येतायत. पण आता कोणती पक्षाला नाही तर स्वतःच्या समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय गिरगावकरांनी घेतला आहे.

advertisement

या मतदार संघातील समस्या

- मराठी माणसाला बेघर केलं जात असल्याचा सातत्याने आरोप होतोय,

- काही दिवसांपूर्वी कबुतरखाने,

- मेट्रो बाधित पुनर्विकास योजनेतील लोकांना घरं,

- बांगलादेशी फेरीवाल्यांचा मुद्दा,

- बेस्ट वीज मुद्दा,

- खराब रस्ते, पाण्याची समस्या, गटारांची अडचण

- विल्सन जिमखाना मैदान आणि इतर अनेक अडचणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, मका आणि कांद्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

या मुद्द्यांवर राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्षांनी पाठ फिरवल्यामुळे आता गिरगावकरांच्या प्रश्नांसाठी गिरगावकरांनी स्थापन केलेल्या 'आम्ही गिरगावकर' संघटनेने थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पण यामुळे स्थानिक पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गिरगावकरांची मनधरणी करताना प्रादेशिक पक्षांच्या नाकीनऊ येणार यात शंका नाही.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election 2025: मुंबई पालिकेच्या निवडणुकीत 'आम्ही गिरगावकर' संघटना उतरणार रिंगणात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल