हिवाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने आधीच नियमित प्रवासी, पर्यटक आणि बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढलेली आहे. त्यातच इंडिगो फ्लाइट रद्द झाल्यानंतर विमान प्रवासीही मोठ्या प्रमाणावर रेल्वेकडे वळले आहेत. यामुळे उपलब्ध क्षमतेत वाढ करण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची मालिका जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
चालवल्या जाणाऱ्या प्रमुख विशेष गाड्या
1) मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (01014)
8 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजता मडगावहून सुटणारी ही गाडी त्याच दिवशी सकाळी 11.45 वाजता LTT येथे पोहोचणार.
2) CSMT – हावडा विशेष (02869)
8 डिसेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता मुंबई CSMTहून सुटेल व 9 डिसेंबर रोजी रात्री 8.55 ला हावडा येथे पोहोचेल.
3) लोकमान्य टिळक टर्मिनस – सियालदह विशेष (03128)
9 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता LTTहून सुटेल आणि 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सियालदह येथे पोहोचेल.
4) लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (05588)
9 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता सुटेल; गोरखपूर येथे 10 डिसेंबर रात्री 8.15 वाजता आगमन.
5) लोकमान्य टिळक टर्मिनस – बिलासपूर विशेष (08246)
12 डिसेंबर रोजी रात्री 12.15 वाजता LTTहून सुटणारी ही गाडी त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
इंडिगो विमानसेवेतील विस्कळीततेमुळे अडकलेले हजारो प्रवासी आता रेल्वेचा सुरक्षित आणि निश्चित पर्याय निवडत आहेत. वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वेने त्वरित अतिरिक्त गाड्या सोडण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, आवश्यकता भासल्यास आणखी काही विशेष गाड्या सुरू करण्याचा विचारही केला जाईल.






