12 ते 23 नोव्हेंबर दरम्यान थोकूर आणि जोकाटे यार्ड परिसरात नवीन रेल्वे रुळांचे कनेक्शन जोडणे आणि पॉइंट्स बसविण्याचे महत्त्वाचे काम होणार आहे. या कामामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Pune News : मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट, 1000 ई बस प्रवाशांच्या सेवेत धावणार
या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
advertisement
14 नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या बंगळुरू–कारवार (16595), त्रिवेंद्रम उत्तर–भावनगर (19259) आणि लोकमान्य टिळक–त्रिवेंद्रम (16345) या गाड्या अनुक्रमे 80, 15 आणि 20 मिनिटांनी उशिराने धावतील.
15 नोव्हेंबर रोजी पोरबंदर–त्रिवेंद्रम उत्तर (20910) ही गाडी 20 मिनिटांनी नियंत्रित राहील.
16 नोव्हेंबर रोजी जामनगर–तिरुनेलवेली (19578) गाडी 30 मिनिटांनी उशिराने धावेल. तर 17 नोव्हेंबर रोजी हीच गाडी 100 मिनिटांनी उशिराने धावेल. त्याच दिवशी बंगळुरू–कारवार गाडीला 20 मिनिटांचा उशीर होईल.
18 नोव्हेंबर रोजी कोयंबतूर–जबलपूर (02197) आणि एर्नाकुलम–पुणे (11098) या गाड्या अनुक्रमे रात्री 8:05 व 9:50 वाजता सुटतील म्हणजे या गाड्यांनाही उशीर होईल. या दिवशी इतर काही गाड्यांना देखील 15 ते 150 मिनिटांचा उशीर होणार आहे.
23 नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी–मंगळूर (12133) गाडी सुरतकल येथेच थांबवून पुढे रद्द करण्यात येईल, तर उलट दिशेची 12134 मंगळूर–मुंबई गाडी सुरतकलहूनच सुरू होईल. याशिवाय मुरुडेश्वर–बंगळुरू (16583) आणि पुणे–एर्नाकुलम (11097) या गाड्याही अनुक्रमे 120 व 50 मिनिटांनी उशिराने धावतील.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना यामुळे होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून प्रवासापूर्वी आपले वेळापत्रक तपासूनच स्टेशनवर पोहोचावे, असे आवाहन केले आहे.






