या भीषण धडकेत बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातावेळी बसमध्ये असलेल्या काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या 5 ते 6 प्रवाशांना तत्काळ उपचारासाठी जोगेश्वरीतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. त्याशिवाय, ट्रकच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर काचांचा सडा पडला आहे. तर, व्हिडीओनुसार अपघातग्रस्त ट्रॅकची बाजूच्या मार्गिकेतून जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याचे दिसून येत आहे.
advertisement
स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. वनराई पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून चौकशी केली जात आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, गाडी चालवताना निष्काळजीपणा झाला असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनराई पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या अपघातामुळे सकाळच्या सुमारास पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.
