TRENDING:

मुंबई पालिकेत प्रथमच भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष, पाहिलं काम पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार; शिंदे यांची ग्वाही

Last Updated:

मुंबई महानगरपालिकेत भाजपचे प्रभाकर शिंदे स्थायी समिती अध्यक्ष झाले. गारगाई धरण प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि पावसाळी पूर्वतयारीला प्राधान्य दिले जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष विराजमान झाला आहे. भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती आणि पावसाळी पूर्वतयारी यांना प्राधान्य दिले जाणार असल्याच म्हटलंय .
News18
News18
advertisement

शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून अतिरिक्त जलस्रोत उभारणीस गती दिली जाणार आहे. विशेषतः गारगाई धरण प्रकल्प पुढे नेण्यावर भर राहणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईकरांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. गारगाई धरणाचा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित असेल. मात्र आता त्या प्रकल्पाला मुहूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्याचा विश्वास नव्या स्थायी समिती अध्यक्षांनी मुंबईकरांना दिलाय.

advertisement

पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी कामे हाती घेतली जाणार आहेत. रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी देखरेख ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्या कामांवर काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

स्थायी समितीच्या माध्यमातून शहरातील मूलभूत सुविधांवर भर देत कामकाजाला गती दिली जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष शिंदे यांनी दिली.

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई पालिकेत प्रथमच भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष, पाहिलं काम पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार; शिंदे यांची ग्वाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल