मुंबईत फूटपाथवर महिलेचा प्रसूती
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या डोंगरी परिसरातील संपूर्ण घटना आहे. जिथे एक गर्भवती महिला तिच्या नवऱ्यासोबत परिसरातून चालत जात होती. दरम्यान अचानक तिच्या भयंकर पोटात दुखू लागलं आणि ती वेदनेने फूटपाथवरच बसली. दरम्यान महिलेच्या दुखूण्यामुळे परिसरात एकच काळजीने गोंधळ उडाला. महिलेला परिसरातील अनेकांनी पकडून चालण्यास सांगितल मात्र तिला चालताही येईना. महिला वेदनेने विव्हळत असल्याने तात्काळ डोंगरी पोलिसांना याबद्दल कळविण्यात आले त्यानंतर डोंगरी पोलिसांच्या दोन गाड्या महिलेच्या ठिकाणी पोहचल्या.
advertisement
देवदूतासारखी धावून आली खाकी वर्दी
घटनास्थळी महिलेला पाहून गर्दी जमली पोलिस आणि महिलेचा पती तिच्या वेदनेने चिंतेच पडले होते. महिलेला दवाखान्यात नेण्यातही अडचण येत होती, कारण तिला वेदनेने चालणेही असह्य झाले होते. त्यामुळे महिलेला लगेच दवाख्यानात जणे धोकादायक आहे याची जाणीव पोलिसांना झाली. त्यानंतर एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने परिसरातून चादर आणि इतर वस्त्रांची व्यवस्था केली शिवाय अन्य महिला पोलिस कॉन्स्टेबलनी चारही बाजूंनी चादर घेऊन आडोसा केला. दरम्यान महिलेने फूटपाथावरच बाळाला जन्म दिला.
बाळाला जन्म दिल्यानंतर एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली जी की प्रसूती झाल्यानंतर नाळ कापणे राहिले, त्यामुळे महिला पोलिसांनी आणि स्थानिकांना बाळंतीणीला कपड्यात लपेटतून जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनीही वेळ न घालवता तिच्यावर उपचार सुरु केले.
ज्यात त्यांनी पहिल्यांदा नाळ कापून बाळाला तिच्यापासून वेगळे केले. या सर्व घटनेत पोलिसांना सर्व परिस्थिती योग्य पद्धतीने सांभाळून घेऊन आणि गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला योग्य वेळी रुग्णालयात दाखल केले त्यामुळे यांचे सर्वत्र कौतुक होत असून बाळ आणि महिला आता सुखरुप असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
