चार स्थानकांवर लोकल थांबा रद्द
या ब्लॉकदरम्यान करी रोड, चिंचपोकळी, मशीद आणि सँडहर्स्ट रोड या चार स्थानकांवर लोकल थांबा रद्द करण्यात आला आहे. करी रोड आणि चिंचपोकळी ही दोन्ही स्थानके दिसायला साधारण सारखी असल्यामुळे ती ‘जुळी स्थानके’ म्हणून ओळखली जातात. त्यामुळे या भागातील प्रवाशांना थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Weather Alert: नोव्हेंबरमध्येही पाऊस! कोकणातून IMD चं महत्त्वाचं अपडेट, मुंबई-ठाण्याला कोणता अलर्ट?
advertisement
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक राहणार आहे.
वेळ: सकाळी 10:55 ते दुपारी 3:55
या काळात काही गाड्या उशिरा धावू शकतात. तर काहींचे वेळापत्रक बदलले जाईल. दुपारी साडेतीननंतर वाहतूक पुन्हा सुरळीत होईल.
हार्बर मार्ग
कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.
वेळ: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10
या काळात हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यानच्या जलद मार्गांवर अप आणि डाऊन दोन्ही बाजूंनी रेल्वे वाहतूक बंद राहील.
वेळ: सकाळी 10:35 ते दुपारी 3:35
ब्लॉकदरम्यान काही चर्चगेट स्थानकाच्या गाड्या वांद्रे/दादर येथेच थांबवल्या जातील.
नियोजित वेळेनंतर रेल्वे सेवा नेहमीप्रमाणे सुरू होतील. मात्र प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, तसेच रेल्वेच्या अधिकृत सूचना लक्षात घ्याव्यात, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.






