परळ रेल्वे टर्मिनस उभारणी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विस्तार या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रकल्प मूल्यांकन समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे मुंबईतील लांब पल्ल्याच्या प्रवासाचे चित्र पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
अधिकाऱ्यांच्या मते, आता रेल्वे बोर्डाची अंतिम परवानगी मिळणे हा केवळ औपचारिक टप्पा उरला असून, ती डिसेंबरअखेर मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळताच काही महिन्यांत टेंडर प्रक्रिया सुरू होण्याची तयारीही मध्य रेल्वेने केली आहे. कामाचा वेग वाढल्यानंतर मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
advertisement
एलटीटीचा विस्तार
एलटीटी–विद्याविहारदरम्यान रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या प्रशस्त जागेमुळे, येथे तीन ते चार नवीन फलाट उभारण्याची योजना आधीपासूनच आखली गेली होती. सध्या एलटीटीवरून 26 जोड्या मेल–एक्स्प्रेस गाड्या नियमितपणे धावतात, तर सुट्टीच्या काळात हा आकडा तब्बल 37 जोड्यांपर्यंत पोहोचतो. अतिरिक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यानंतर,
1) जास्त गाड्यांना सुटण्याची आणि थांबण्याची सुविधा
2) सण-उत्सव कालावधीत विशेष गाड्या चालविण्याची अधिक लवचिकता
3) गाड्यांच्या वेळापत्रकातील विलंब कमी होणे.






