मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) सोबतच्या भागीदारीनुसार, अॅक्वा लाईन वरील प्रमुख स्थानकांबाहेर ठरवलेल्या पिकअप झोनमध्ये उबर ऑटो, बाईक राईड आणि कॅब सेवा उपलब्ध असतील. नवख्या प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी मेट्रो स्थानकावरून पिकअप झोनपर्यंत कसं जायचं? हा मार्ग दाखवणारा फलक देखील तिथे असणार आहेत. त्याचबरोबर, अॅपमधील नेव्हिगेशन सुद्धा दिशा दाखवतील. जिओफेन्स पिकअप सुविधा प्रवाशांना प्लॅटफॉर्मपासून थेट उबर पॉईंटपर्यंत नेतील. यामुळे वर्दळीच्या वेळी स्थानकांवरची गर्दी कमी होण्यासाठी मदत होईल, शिवाय प्रवास सुद्धा अधिक सुरळीत होईल.
advertisement
उबरने अलीकडेच सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा पुरवणाऱ्या एजन्सीजसोबत पार्टनरशिप करणाऱ्या सुरूवात केली आहे. त्यापैकीच ही पण एक सुविधा असणार आहे. लखनऊ- दिल्लीतल्या रॅपिड रेलसोबत आणि दिल्ली, चेन्नई आणि मुंबई मेट्रो लाईन-1 मध्ये उबर ॲपवर मेट्रो- तिकीट सेवा आधीपासूनच सुरू आहे. त्यानंतर कंपनी आता ही सेवा लाईन-3 वरही देण्याच्या तयारीत आहे.
अलीकडेच उद्घाटन झालेल्या मेट्रो लाईन 3, ज्याला ॲक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते. या मेट्रोसेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महिन्याभरात प्रवाशांची वाढती संख्या प्रवाशांचा वाढता विश्वास आणि शहराच्या भूमिगत मेट्रो सिस्टीमची वाढती लोकप्रियता दर्शवते.
अधिकृत आकडेवारीनुसार, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान ॲक्वा लाईनने एकूण 3,863,741 प्रवाशांनी वाहतूक केली आहे. ज्यामुळे उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या मार्गावर दररोजची वाहतूक सातत्याने सुरू असल्याचे दिसून येते.
मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन 3 प्रकल्प सुमारे 33.5 किलोमीटर लांबीचा असून त्यात 27 स्थानके आहेत. हा प्रकल्प मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शहरी वाहतूक पायाभूत सुविधांपैकी एक आहे.
