TRENDING:

Mumbai News: मुंबईत अंडरग्राऊंड ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचं काम जोरात, कधीपर्यंत होणार पूर्ण?

Last Updated:

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईसह उपनगरांत विकासकांनी अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टसची कामे हाती घेतली आहेत. सध्या ही विकास कामे जोरात सुरू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, ऑरेंज गेट (ईस्टर्न फ्रीवे) ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याचे सुमारे 14% काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर काढत या कामाला किती दिवसांचा अवधी लागणार? सोबतच खर्च किती? यासह अंडरग्राऊंड बोगद्याबद्दलची माहिती दिली आहे.
Mumbai News: भूमिगत ऑरेंज गेट- मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचे काम जोरात, केव्हापर्यंत पूर्ण होणार?
Mumbai News: भूमिगत ऑरेंज गेट- मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचे काम जोरात, केव्हापर्यंत पूर्ण होणार?
advertisement

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे. 8,056 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा प्रकल्प 54 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील पूर्व- पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडले जाणार आहेत. एकूण प्रवासाचा वेळ 15- 20 मिनिटांनी कमी होणार आहे. सोबतच इंधनाची बचत होणार आहे. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

advertisement

हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) च्या 50 मी. खालून जातो. प्रकल्पाची एकूण लांबी 9.96 किमी आहे, ज्यामध्ये जवळपास 7 किमी भुयारी मार्ग आहे. प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटर रुंदीचे 2 पदरी रस्ते, 1 पदरी आपत्कालीन रस्ता असेल. दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग 80 किमी/तास इतकी असेल. दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी 300 मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील. बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.

advertisement

आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेश्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य आणि आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे. प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते, शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते. सदर प्रकल्प हा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन (Slurry Type TBM) असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दर घसरलेलेच, सोयाबीन आणि कांद्याची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (OEM) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईत अंडरग्राऊंड ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचं काम जोरात, कधीपर्यंत होणार पूर्ण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल