TRENDING:

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळ कधीपासून सुरु होणार, तिकीट नोंदणी केव्हापासून? पाहा कोणत्या विमानसेवा असतील उपलब्ध

Last Updated:

Navi Mumbai International Airport Service Start: पुढच्या महिन्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाणाला सुरूवात होणार आहे. केव्हापासून विमान उड्डाणाला सुरूवात होणार आहे ? प्रत्यक्ष विमान उड्डाणासाठी तिकिटाची नोंदणी प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे? जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गेल्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते काही प्रोजेक्टचे उद्घाटनही करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे, नवी मुंबई विमानतळाचे उद्धाटन. नवी मुंबई विमानतळाचे उद्धाटन करण्यात आले होते, परंतु तिथून विमानाचे उड्डाण होत नव्हते. परंतु आता प्रत्यक्षात विमानाचे उड्डाण आता होणार आहे. पुढच्या महिन्यापासून विमानच्या उड्डाणाला सुरूवात होणार आहे. केव्हापासून विमान उड्डाणाला सुरूवात होणार आहे ? प्रत्यक्ष विमान उड्डाणासाठी तिकिटाची नोंदणी प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे? जाणून घेऊया...
Navi Mumbai Airport: महापालिका निवडणुकांपूर्वीच उडणार विमान! महायुती सरकारची जोरदार मोर्चेबांधणी
Navi Mumbai Airport: महापालिका निवडणुकांपूर्वीच उडणार विमान! महायुती सरकारची जोरदार मोर्चेबांधणी
advertisement

कल्याण- डोबिंवली, ठाणे आणि नवी मुंबईतील रहिवाशांसाठी ही एक प्रकारची आनंदाची बातमी आहे. या भागातील लोकांचा आता मुंबई पर्यंतचा प्रवास वाचणार आहे. येत्या 25 डिसेंबरपासून म्हणजेच, ख्रिसमसपासून नवी मुंबई विमानतळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. सोबतच, प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकिट नोंदणीच्या प्रक्रियेला अजून तरी सुरूवात झाली नाही, अद्याप तिकिट नोंदणीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही. जर नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणाला सुरूवात झाली तर, ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिकिट नोंदणी सुरू होऊ शकते.

advertisement

पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन झाल्यानंतर विमानतळावर सुरक्षाविषयक यंत्रणा बसवण्यासाठी आणि सुरक्षा दलाला तैनात करण्यासाठी 45 दिवसांसाठी विमानतळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर सर्व सुरक्षाविषयक खबरदारी घेतल्यानंतर विमानतळ सुरू करण्यात येत आहे. शिवाय, विमानतळाच्या इमारतीतील अंतर्गत सजावट आणि सुविधाविषयक कामे शेवटच्या टप्प्यात आली आहेत. शेवटचा टचअप देण्याचं काम सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ व्यवस्थापनाकडून देशांतर्गत सेवा सुरू करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय विमानसेवा लगेचच सुरू होणार नाही. सध्या एनएमआयए विमानतळ चालवणाऱ्या कंपनीसोबत एअर इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्यांनी प्रवासी वे सेवा सुरू करण्याबाबत करार केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 रुपयांपासून इथेनिक बांगड्या, व्यवसायाठी खरेदीची संधी, मुंबई इथं आहे मार्केट
सर्व पहा

त्यानुसार एनएमआयएएलने विमान कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर २५ डिसेंबरपासून प्रवासी सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त अनेक प्रवासी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी ट्रीपला जात असतात. ही बाब लक्षात घेत, नवी मुंबई विमानतळाहून ख्रिसमससारख्या सणाच्या काळात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना पहिल्यांदा नवी मुंबईच्या जमिनीहून उडण्याचा अनुभव घेता येणार आहे. दिवसभरात 12 उड्डाणे होणार असल्याचे समजते आहे. गोवा, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, केरळ अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये सेवा दिली जाणार असल्याचे समजते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळ कधीपासून सुरु होणार, तिकीट नोंदणी केव्हापासून? पाहा कोणत्या विमानसेवा असतील उपलब्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल