TRENDING:

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! मंगळवारी 18 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

Last Updated:

Navi Mumbai Water Shortage: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिनिधी विश्वनाथ सावंत
News18
News18
advertisement

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील एम.बी.आर.मध्ये नवीन जलवाहिनी जोडणी तसेच मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसविणे आणि देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून, यासाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा १८ तासांसाठी बंद राहणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार ५ नोव्हेंबर पहाटे ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील. या काळात बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडणी असलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोड मधील पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद राहील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार, देविका यांनी सुरू केली शाळा, Video
सर्व पहा

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहील, तर बुधवारी सकाळचा व संध्याकाळचा पुरवठा कमी दाबाने होणार आहे. म्हणून महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! मंगळवारी 18 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल