कल्याण-दादर ट्रेननं प्रवास
राज ठाकरे खूप वर्षींनी ट्रेननं प्रवास करत आहेत. त्यांनी याआधी कल्याण ते दादर असा ट्रेननं प्रवास केला होता. तो त्यांचा ट्रेनप्रवास चांगलाच चर्चेत आला होता.जाताना ते गाडीनं आणि येताना ट्रेननं आले होते. रस्त्यावरचे खड्डे आणि वाहतूक कोंडी पाहून त्यांनी त्यावेळी ट्रेननं येणं पसंत केलं होतं. राज ठाकरे यांचा हा प्रवास काही पहिल्यांदा नाही. याआधी देखील त्यांनी बऱ्याचवेळा ट्रेननं प्रवास केला आहे. दादरहून चर्चगेट प्रवास करणारे राज ठाकरे एकेकाळी हार्बरवरुन रोज प्रवास करायचे.
advertisement
जे.जे. कॉलेजला कसे जायचे?
राज ठाकरे यांनी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. त्यावेळी कॉलेजला जाताना ते बांद्रा ते सीएसएमटी असा हार्बर मार्गावरुन प्रवास करायचे. त्यांचं त्यावेळी घर बांद्र्याला होतं. तिथून ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सला दररोज दोन वर्ष हार्बरने प्रवास करत होते. राज ठाकरे यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं, पण त्यांनी ते अर्धवट सोडलं. त्यामुळे त्यांच्याकडे पदवी नाहीय.
उद्धव ठाकरे आधी जे.जे स्कूलला गेल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यामागून कॉलेजला शिक्षण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी अॅडमिशन घेतली होती. मात्र कॉलेज अर्धवट सोडलं. मात्र ती दोन वर्ष त्यांनी ट्रेननं प्रवास केल्याचं एका भाषणादरम्यान सांगितलं होतं. याआधी देखील राज यांनी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे लोकल प्रवास केला होता.
सत्याचा मोर्चामध्ये सहभागी
निवडणुकीतील बोगस मतदानाविरोधात मविआसह मनसेचा आज मुंबईत “सत्याचा मोर्चा” आहे. यापार्श्वभूमीवर BMC परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे एकत्र मोर्चात चालणार आहे. स्थानिक स्वराज संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीआधी हा मोर्चा काढला जात आहे. विरोधकांकडून मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर या मोर्चादरम्यान
