मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी गर्दीने गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या परिसरात ही घटना घडली. स्टेशनच्या बाहेर असलेल्या बस स्थानकामध्ये ही बॅग ठेवण्यात आली होती. बराच वेळ झाला तरी कुणीही ही बॅग घेऊन न गेल्यामुळे लोकांना संशय बळावला. लाल रंगाची बॅग संशयास्पद अवस्थेत असल्यामुळे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर खाली केला. त्यानंतर घटनेची माहिती बॉम्बनाशक पथकाला देण्यात आली.
advertisement
पोलिसांनीच बॅगची तपासणी केली. असता सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. बॅगेमध्ये काही आढळलं नाही, बॅगेत फक्त कपडे आणि पुस्तकं होती. कोणत्या तरी प्रवाशाची ही बॅग इथं राहिली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबई पोलिसांसोबत आरपीएफ, जीआरपी देखील घटनास्थळी बस डेपो रिकामा करण्यासाठी घटनास्थळी आले होते. पण, ही बॅग कुणी आणि का ठेवली, या मागे काही वेगळा हेतू तर नव्हता ना, या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.
