एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये एनडीएची 43 टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर महागठबंधन (MGB) ची 41 टक्के टक्केवारी आहे. तर जन सुराज पार्टी (JSP) ला 4 टक्के इतकी मतं मिळाली आहे. तर उरलेली १२ टक्के ही इतर आणि अपक्षांना मिळाली आहे.
Axis My India च्या एक्झिट पोलनुसार एनडीएला १२१ ते १४१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महागठबंधन ९८ ते ११८ जागा मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. या आकड्यांची सरासरी काढली तर एनडीए १३० ते १३१ जागा मिळवून सत्तेत येईल असं अंदाज आहे. तर महागठबंधन जवळपास १०९ ते ११० जागांवर थांबू शकतो.
advertisement
पण ,या एक्झिट पोलमध्ये जन सुराजच्या वाट्याला फारशा जागा येत नसल्या तरी, पक्षाला मिळालेलं सुमारे चार टक्के (४%) मत एनडीएच्या अडचणी वाढवत आहे. विशेष म्हणजे, या चार टक्के मतांपैकी जवळपास ७५ टक्के मते एनडीएच्या पारंपरिक (परंपरागत) मतपेटीतून निसटलेली आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, जन सुराजचा उदय हा महागठबंधनपेक्षा एनडीएसाठी अधिक मोठं आव्हान बनणारआहे.
कोणत्या संस्थांनी कुणाला किती जागा दिल्या?
| न्यूज १८ (News 18) | १४०-१५० | ८५-९५ | ०-५ | ५-१० |
| स्रोत (Source) | एनडीए (NDA) | एमजीव्ही (MGB) | जेएसपी (JSP) | इतर (OTH) |
| चाणक्य स्ट्रॅटेजीज (Chanakya Strategies) | १३०-१३८ | १००-१०८ | ०-० | ३-५ |
| हिंदी वृत्तपत्र | १४५-१६० | ७३-९१ | ०-३ | ५-७ |
| डीव्ही रिसर्च (DV Research) | १३७-१५२ | ८३-९८ | २-४ | १-८ |
| जेव्हीसी (JVC) | १३५-१५० | ८८-१०३ | ०-१ | ३-६ |
| मॅट्रिझ (Matrize) | १४७-१६७ | ७०-९० | ०-२ | २-८ |
| पी-मार्क (P-Marq) | १४२-१६२ | ८०-९८ | १-४ | ०-३ |
| पीपल्स इनसाईट (People's Insight) | १३३-१४८ | ८७-१०२ | ०-२ | ३-६ |
| पीपल्स पल्स (Peoples Pulse) | १३३-१५९ | ७५-१०१ | ०-५ | २-८ |
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले तर मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान पार पडले. एकूण २४३ जागांसाठी मतदान संपन्न झाले असून १२२ हा बहुमताचा आकडा आहे. आता १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्यावेळी खरं चित्र स्पष्ट होईल.
