बिहारमध्ये यंदा प्रथमच जेडीयू आणि भाजपनं समान जागा लढवल्या आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. पैकी भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकाच पायरीवर आहे. त्यामुळे दोघांमध्ये मोठा भाऊ कोण ठरतं याकडे लक्ष लागलं होतं. सध्याच्या घडीला दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे. भाजप 90 ,लोजप 22, हिंअमो 5, रासोमो 3 जागा मिळाल्या आहेत. तर जेडीयूला 78 जागा मिळाल्या आहेत.
advertisement
स्ट्राईक रेटनुसार भाजप एक नंबरवर
जर वरील आकडेवारी विचारात घेतली तर जेडीयुशिवाय देखील भाजप सत्ता स्थापन करू शकते. कारण जेडीयू शिवाय इतर मित्र पक्षांना मिळालेल्या जागा आणि भाजपला मिळालेल्या जागा यांची बेरीज घेतली केली तर भाजप बहुमताचा जादुई आकडा सहजरीत्या गाठू शकतो. जेडीयुशिवाय जर भाजपने जर पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर 120 जागांपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जे शिंदेंच्या शिवसेनेसोबत झालं तेच बिहारच्या निवडणुकीत देखील होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाले आहे. स्ट्राईक रेटनुसार भाजप हा एक नंबरवर आहे तर जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई संख्या 122
बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई संख्या 122 आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (११ नोव्हेंबर) संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी झाले, ज्यामध्ये 18 जिल्ह्यांमधील 121 जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात सरासरी 65.08 टक्के मतदान झाले.
हे ही वाचा :
