बिहारचे सिंघम या नावाने ओळखले जाणारे लांडे पहिल्यांदाच राजकरणात उतरले आहे. खाकी सोडून ते खादीच्या तयारीत आहे. इंडियन इनक्लुझिव्ह पार्टीच्या ) नरेंद्र कुमार तांती आणि जदयूच्या नचिकेता मंडल यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे शिवदीप लांडे हे जमालपूर मतदारसंघातून विजयी होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
advertisement
पाच फेऱ्यांमध्ये अत्यल्प मतं
बिहारचे सिंघम या नावाने ओळखले जाणारे लांडे पहिल्यांदाच राजकरणात उतरले आहे. खाकी सोडून ते खादीच्या तयारीत होते . मात्र पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये त्यांना अत्यल्प मतं मिळालं असून बिहारच्या जनतेनं नाकारल्याचं चित्र दिसत आहे.शिवदीप लांडे यांच्यासमोर इंडियन इनक्लुझिव्ह पार्टीच्या नरेंद्र कुमार आणि जदयूच्या नचिकेता मंडल यांचे आव्हान होते.
महाराष्ट्राच्या लेकाला किती मतं मिळाली?
जमालपूर मतदारसंघात पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये जदयूचे नचिकेता मंडल हे आघाडीवर असून त्यांना आतापर्यंत 18067 मते मिळाली. तर नरेंद्र कुमार यांना 10502 मतं मिळाली आहे. दोघांमध्ये सध्या चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर शिवदीप लांडे पाच फेऱ्यानंतर चौथ्या स्थानी असून त्यांना 1456 मते मिळाली आहे.
ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले
बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे यांनी हा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामगिरीमुळे बिहारमध्ये त्यांची ओळख सिंघम म्हणून आहे. काही काळ त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते.
हे ही वाचा :
