मोकामा विधानसभेसाठी यावेळी तीन मोठे चेहरे मैदानात आहे. बाहुबली नेता अनंत कुमार, आरजेडीच्या वीणा देवी आणि जन सुराज पक्षाच्या पीयूष प्रियदर्शी हे रिंगणात आहे. अनंत सिंह आणि वीणा देवी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या 15 फेऱ्या पार पडल्या. या फेऱ्यामध्ये अनंत कुमार सिंह 15 हजार मतांनी आघाडीवर आहे.
advertisement
जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छुटेगा...
बिहार निवडणुकांचा काही जागांचा सस्पेन्स जवळपास संपला आहे. अनंत सिंह याला 15 फेऱ्यानंतर 55 हजार मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार वीणा देवी यांना 40 हजार मते मिळाली आहे. अनंत सिंह यांनी आघाडी मिळताच मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मतदारसंघात मोठे पोस्टर लावण्यात आले असून जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छुटेगा अशा आशायाचा मजकूर त्यावर आहे.
मतदारसंघात जल्लोषाची तयारी
अनंत सिंह यांच्यानंतर आता सुरजभान सिंह याच्या घरीही विजयाची तयारी सुरु आहे. येथे विजय साजरा करण्यासाठी मिठाई तयार करण्याचे काम सुरु आहे. पाटणा येथील निवासस्थानी समर्थकांचा गोतावळा जमला आहे. येथे मोठे तंबू उभारले आहेत. खुर्च्या लावल्या जात आहेत. हजारो लोकांना कोणतीही अडचण नको म्हणून खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था केली जात आहे. लंडनमध्ये असलेले अनंत सिंह यांचे पुत्र व्हिडिओ कॉलद्वारे संपूर्ण तयारीवर लक्ष ठेवत आहेत.
तुरुंगात असला तरी सर्व निवडणुकीवर लक्ष
अनंत सिंह हे तुरुंगात असला तरी त्यांचे सर्व निवडणुकीवर लक्ष आहे. सध्या सामान्य कैद्यांप्रमाणेच अनंत सिंहला आठवड्यातून एकदाच भेटण्याची परवानी आहे. तरीही त्यांच्या समर्थकांकडून त्यांना मेजवानीच्या सर्व तयारीची सविस्तर माहिती पोहोचवली जात आहे. सुरक्षा, स्वयंपाक आणि सर्व सुविधांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. अनंत सिंह 2005 पासून मोकामाचे चार वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी दोनदा JDU, एकदा RJD आणि एकदा अपक्ष म्हणून विजय मिळवला.
कोणत्या प्रकरणात झाली अटक?
जन सुराज पक्षाच्या समर्थकाचा दुलारचंद यादवही हत्या केल्याप्रकरणी अनंत सिंह तुरुंगात आहे. दुलारचंद यादव हे पूर्वी राजदचे नेते होते आणि लालू प्रसाद यादव यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. ते जन सुराजच्या ताफ्यात प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्याचे सांगितले. शवविच्छेदन अहवालात असे समोर आले आहे की, एका वाहनाने त्यांच्या छातीवरून गाडी चालवल्यामुळे फुफ्फुसे आणि इतर अंतर्गत अवयवांवर दाब येऊन हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
