पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राज्याचे संपूर्ण राजकीय गणित बदलून टाकले आहे. सर्व एक्झिट पोल्स फेल ठरवत एनडीएने तब्बल 200 जागांच्या आसपास आघाडी घेत अभूतपूर्व विजय मिळवला. या विजयामागे सर्वात मोठा आणि निर्णायक घटक ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिलांसाठी दिलेली 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत. या योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 1.3 कोटी महिलांच्या खात्यात थेट पैसा जमा झाल्याने महिलांमध्ये नीतीश यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. याचा परिणाम मतदानात स्पष्टपणे दिसून आला.
advertisement
राज्यातील 243 पैकी 124 जागा अशा होत्या जिथे महिला मतांचे प्रमाण निर्णायक होते. त्या 124 पैकी तब्बल 106 जागांवर एनडीएने आघाडी घेतली, तर इंडिया आघाडीला फक्त 14 जागांवर आघाडी मिळाली. या 106 पैकी भाजपला 45 आणि जेडीयूला देखील 45 जागांवर आघाडी आहे, तर एनडीएतील एलजेपी, HAM आणि RLM या लहान घटक पक्षांनाही योजनेचा थेट फायदा झाला आहे. म्हणजेच, महिलांनी एनडीएतील सर्व पक्षांना समान पद्धतीने लाभ करून दिला.
तेजस्वी यादवने थेट पक्षच बुडवला, केल्या 52 घोडचुका; पराभवाची Inside story
निर्णायक महिला मतांचा परिणाम जिथे झाला, त्या मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीला मोठा तोटा बसला. महिला फॅक्टरच्या क्षेत्रात इंडिया ब्लॉकला 31 जागांचे नुकसान झाले असून त्यातील 12 जागा थेट आरजेडीच्या गमावल्या गेलेल्या आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही प्रत्येकी एक जागेचा धक्का बसला. याउलट, एनडीएने केवळ आपली संघटना मजबूत ठेवली नाही तर महिला-केंद्रित योजनांच्या जोरावर थेट जमीन गाठली.
PK है क्या? किंग मेकरने लिहली स्वत:च्या पराभवाची स्क्रिप्ट,रॉकेट टेकऑफपूर्वीच...
नीतीश कुमार यांची 10,000 रुपयांची योजना, मोफत वीज योजना आणि वृद्धापकाळ पेन्शन वाढ—या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून महिलांनी यंदाच्या निवडणुकीत विक्रमी सहभाग नोंदवला. मतदानात महिलांचा 71% पेक्षा अधिक सहभाग हा बिहारच्या इतिहासातील सर्वोच्च ठरला. महिला मतदारांच्या या लाटेने निकाल थेट एनडीएच्या बाजूला झुकवला. तेजस्वी यादव यांनी महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी नीतीश कुमार यांच्या खात्यात आधीच जमा झालेल्या 10,000 रुपयांनी हा दावा फिका ठरला.
आकडेवारीवरून स्पष्ट होते की बिहारचा संपूर्ण निकाल ‘महिला मतांच्या सुनामीने’ ठरवला. नीतीश कुमार यांच्या योजनांनी महिलांच्या मनात निर्माण केलेला विश्वास आणि मोदी-नीतीश यांच्या संयुक्त नेतृत्वातील स्थिरतेचा संदेश, या दोन्हींच्या आधारावर एनडीएने इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक नोंदवला आहे.
