रतलाम: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दिल्ली–मुंबई एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रावत़ी पोलिस ठाणे हद्दीत जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून मुंबईकडे वेगाने जात असलेली कार अचानक नियंत्रणातुन सुटली आणि एक्स्प्रेसवेवरील अॅल्युमिनियम बॅरिअर तोडत रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली.
advertisement
रतलामचे पोलिस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की- कारचा वेग अतिशय जास्त होता, कारण तिने ज्या बॅरिअरला धडक दिली तो बॅरिअर मजबूत धक्काही सहन करण्यास सक्षम असतो. प्रथमिक तपासात असे दिसून आले आहे की गाडीचा चालक कदाचित झोपेच्या झटक्याने नियंत्रण गमावून बसला. ज्यामुळे वाहन रस्त्याबाहेर जाऊन थेट दरीत पडले.
या भीषण अपघातात वाहनातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 वर्षांचा मुलगा आणि 70 वर्षांचे वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले आणि त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवले.
पोलिसांनी अपघाताचे कारण स्पष्ट करण्यासाठी सविस्तर तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चालक काही क्षण झोप लागल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन हा भीषण अपघात झाला असावा परंतु अंतिम निष्कर्ष तपासानंतरच मिळणार आहे.
