बिहारमध्ये विविध मतदारसंघांत पक्षाने एकूण 15 उमेदवार केल्याची घोषणा केली होती. मात्र उमेदवारांना मिळालेली मत पाहता जनतेने त्यांना सपशेल नाकारलं आहे. सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीकडील उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला ५०० मतांचाही टप्पा पार करता न आल्याने ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. या 15 पैकी तब्बल 13 उमेदवारांना मिळालेली मते इतकी कमी आहेत की त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर मतदानाच्या सुरुवातीच्या दोन ते तीन फेऱ्यांमध्येच उमेदवारांची मते शंभरीदेखील पार न गेल्याचे आकडे सांगत आहेत.
advertisement
राजकीय विश्लेषकांच्या मते, बिहारसारख्या राज्यात स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, जातीय समीकरणे आणि स्थानिक नेतृत्व हे निवडणुकीतील निर्णायक घटक ठरतात. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बिहारमध्ये या तिन्ही मुद्द्यावर काम करता आले नाही. त्यातच, स्थानिक नेत्यांशी असलेला संवाद, जनतेत पक्षाची कमी असलेली ओळख हे घटक निर्णायक ठरल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
कोणत्या उमेदवाराला किती मतं?
- जय प्रकाश (43 मतं)
- अमित कुमार कुशवाह (370 मतं)
- सैफ अली खान (196)
- बिपीन सिंह (144)
- धर्मवीर कुमार (25)
- अखिलेश कुमार ठाकूर (149)
- अनिल सिंह (147)
- विकास कुमार (127)
- अनिल कुमार सिंह (52)
- आदिल आफताब खान (192)
- मुन्ना कुमार (80)
- आशुतोष सिंह (21)
- मनोज कुमार सिंह (53)
- राशिद अझीम
- हरीलाल पासवान
मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त
निवडणूक नियमांनुसार, मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 1/6 भाग इतकी मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. बिहारमध्ये राष्ट्रवादीच्या बहुतांश उमेदवारांची स्थिती हीच आहे. अजित पवारांनी एनडीएसोबत राहण्याऐवजी बिहारमध्ये स्वतंत्र लढत देण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल. मात्र, हा डाव उलटाच पडला आणि महाराष्ट्राबाहेर पक्षाची विश्वासार्हता आणखी कमी झाली.
भाजप हा एनडीएमधील मोठा पक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये आलेल्या कलांमध्ये एनडीएनं मोठी आघाडी घेतली असून सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे राहणार हे स्पष्ट झाले आहे. एनडीएला 200 पार जागा मिळाल्या असून भाजप हा एनडीएमधील मोठा पक्ष ठरला आहे.
