TRENDING:

दीड एकरात 4 लाख! बीडच्या शेतकऱ्याला सापडला बक्कळ कमाईचा फॉर्म्युला

Last Updated:
Onion Farming: मराठवाड्यातील शेती पाण्याअभावी बेभरवशाची मानली जाते. बीडमधील एक शेतकरी दीड एकर कांदा शेतीतून चार लाखांपर्यंत उत्पन्न घेतोय.
advertisement
1/5
दीड एकरात 4 लाख! बीडच्या शेतकऱ्याला सापडला बक्कळ कमाईचा फॉर्म्युला
मराठवाड्यातील शेती ही पाण्याअभावी बेभरवशाची मानली जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी हे हंगामी शेतीच करतात. बऱ्याचदा बाजारभाव आणि पाऊस यामुळे हाती काहीच लागत नाही. परंतु, बीडच्या एका शेतकऱ्याला यशाचा फॉर्म्युलाच सापडला आहे.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यातील शेतकरी सुंदर राठोड हे कांदा उत्पादक शेतकरी म्हणून चर्चेत हेत. माजलगाव तालुक्यातील माली पारगाव इथे त्यांची शेती असून पूर्वी ते पारंपरिक शेतीच करत होते.
advertisement
3/5
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राठोड यांनी सुरुवातीला अर्धा एकर कांद्याची लागवड केली. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. त्यामुळे त्यांनी दीड एकर शेतात कांदा लावगड केली आणि यातून त्यांना सरासरी चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं.
advertisement
4/5
शेतात पाणीटंचाई असल्याने सुरुवातीला विहीर खोदण्याचा निर्णय राठोय यांनी घेतला. परंतु दुर्दैवाने त्या विहिरीला पाणी लागलं नाही. तरीही त्यांनी हार न मानता पुढील प्रयत्न चालू ठेवले. बोअरवेल खोदल्यावर शेवटी पाणी लागलं आणि त्यातून ते पाण्याचं योग्य नियोजन करून शेती करतात.
advertisement
5/5
गेल्या काही वर्षांत ते कांद्याची शेती करत असून आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांना यशाचा फॉर्म्युला सापडला आहे. त्यांचा शेतीसाठीचा हाच फॉर्म्युला अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
दीड एकरात 4 लाख! बीडच्या शेतकऱ्याला सापडला बक्कळ कमाईचा फॉर्म्युला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल