Animal Care : उन्हाळ्यात दूध होणार नाही कमी, दुग्धजन्य जनावरांना द्या असा आहार, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
दुग्धजन्य जनावरे आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये खूप असा त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे त्यांचे दूध देण्याचे प्रमाण देखील कमी होतं.
advertisement
1/7

उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे. उन्हाळ्याचा प्रचंड असा त्रास आपल्याला होतो. त्याचप्रमाणे दुग्धजन्य जनावरे आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये खूप असा त्रास होतो.
advertisement
2/7
कारण की उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे त्यांचे दूध देण्याचे प्रमाण देखील कमी होतं. तर दुग्धजन्य जनावरे आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांचा आहार कसा असला पाहिजे? याविषयीचं माहिती पशुवैद्यकीय अधिकारी महेश पवार यांनी दिली आहे.
advertisement
3/7
उन्हाळा सुरू झाला की सर्वात पहिले जनावरांना तुम्ही थंड अशा जागी बांधायला हवं किंवा सावलीत त्यांना बांधलं पाहिजे. सकाळच्या वेळी त्यांना जास्तीत जास्त हिरवा चारा देणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
हिरवी मका, वैरण, लसूण हे त्यांना देणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही त्यांना जो वाळलेला चारा आहे तो देखील समप्रमाणात देणे गरजेचे आहे. ते त्यांच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
advertisement
5/7
त्यासोबतच तुम्ही त्यांना दररोज 50 ग्रॅम मिनरल मिक्सर म्हणजेच क्षार मिक्सर तसेच 50 ग्रॅम मीठ किंवा या व्यतिरिक्त जे टॉनिक असतात ते तुम्ही त्यांच्या आहारामध्ये मिक्स करून देणे त्यांना गरजेचे आहे.
advertisement
6/7
हे दिल्यामुळे त्यांची दूध वाढण्याची क्षमता वाढते आणि दुधाची क्वालिटी देखील वाढते. त्याचबरोबर कॉन्टिटी देखील वाढते.त्याचबरोबर म्हशी आणि गाईला 60 ते 80 लिटर पाणी हे दिवसभरात देणे गरजेचे आहे.
advertisement
7/7
या पाण्यामध्ये तुम्ही 50 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम क्षार मिक्सर चांगल्या क्वालिटीचा आणि शंभर ते दीडशे ग्रॅम गूळ या पाण्यात मिक्स करून तुम्ही जर ते पाणी त्यांना प्यायला दिलं तर त्यांना याचा खूप असा फायदा होतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या दुग्धजन्य जनावरांची काळजी घेऊ शकता, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी महेश पवार यांनी सांगितली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Animal Care : उन्हाळ्यात दूध होणार नाही कमी, दुग्धजन्य जनावरांना द्या असा आहार, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला