Astrology: अपेक्षा सोडायची नाही! नवीन वर्ष 2026 तुमचंच, सूर्य-शुक्राच्या युतीचा 3 राशींना जबर अर्थलाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology 2026: या जगात शाश्वत असं काही नाही, आपल्याला सुख-दु:ख पाहतच आयुष्य काढावं लागतं. कधी-कधी फार निराशा होते, कशातच उत्साह जाणवत नाही, पण निराश होऊन चालत नाही, प्रयत्न करावेच लागतात. गेल्या कित्येक दिवसांपासून निराशा पाहणाऱ्यांना आता नव्यानं सुखाचे दिवस येणार आहेत.
advertisement
1/5

द्रिक पंचांगनुसार, 2026 मध्ये सूर्य आणि शुक्र शनीच्या मकर राशीत एकत्र येतील ज्यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल. त्याचा काही राशीच्या लोकांना नवीन वर्षात फायदा होणार आहे. अशा भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/5
सूर्य-शुक्र यांची युती ज्योतिषशास्त्रात खूप खास मानली जाते, राशींच्या जीवनात आर्थिक स्थिरता घेऊन येते. ज्यांच्या कुंडलीत सूर्य आणि शुक्र एकत्र येतात, त्या व्यक्तीला जीवनात प्रेम, धन आणि करिअरवर शुभ परिणाम पाहायला मिळतात. नवीन वर्ष 2026 मध्ये सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने कोणत्या राशींचे भाग्य चमकेल याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/5
2026 मध्ये सूर्य-शुक्र यांची युती मेष राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि आकर्षण दोन्ही वाढवेल. करिअरमधील दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. जे लोक नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची अपेक्षा करत आहेत, त्यांना चांगल्या संधी आता मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. धन-संपत्तीच्या बाबतीत घेतलेले निर्णय लाभ देतील.
advertisement
4/5
2026 मध्ये सूर्य-शुक्र यांची युती मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानली जात आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या कमी होतील. नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यात यश मिळू शकते. कामातही सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळू शकतात.
advertisement
5/5
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य-शुक्र यांची युती अत्यंत शुभ ठरू शकते. प्रतिष्ठा, नेतृत्व क्षमता आणि यश एकत्रच मिळेल, पैसा त्यासोबत आपोआप येईल. तुम्ही ज्या कोणत्याही क्षेत्रात काम कराल, तिथे तुमचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. लोक तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. तुमचा सामाजिक दरारा वाढेल. प्रेमसंबंध चांगले राहतील, वैवाहिक जीवनातही सुसंवाद राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: अपेक्षा सोडायची नाही! नवीन वर्ष 2026 तुमचंच, सूर्य-शुक्राच्या युतीचा 3 राशींना जबर अर्थलाभ