Hastrekha Shastra: तळहातावर अशा रेषा असणाऱ्यांचे लग्नानंतर अनपेक्षित दिवस पालटतात, प्रचंड पैसा कमावतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Hastrekha Shastra: तळहातावरील रेषा पाहून आपण लोकांचे नशीब जाणून घेऊ शकतो. हस्तरेषाशास्त्रात हातावरील रेषांवरून अनेक गोष्टी जाणून घेता येतात. हातावरील रेषा आणि खुणा यांचा संबंध भविष्यातील गोष्टींसाठी जोडलेला असतोय. कोणत्याही व्यक्तीच्या हस्तरेषांवरून वर्तमान आणि भविष्य जाणून घेण्यास मदत होते. तळहातावरील चंद्राची स्थिती, त्याच्या सभोवतालच्या रेषा आणि खुणा एखाद्याविषयी अनेक गोष्टींचा अंदाज लावू शकतात.
advertisement
1/5

हस्तरेषाशास्त्रानुसार, आपल्या हातावर बुध पर्वत करंगळीच्या खाली असतो, त्याच्या अगदी खाली चंद्राचं स्थान असतं. आपल्या आयुष्यातील चंद्राची स्थिती समजून घेण्यास त्यामुळे मदत होते. म्हणजेच, तुमच्या कुंडलीत चंद्र चांगला आहे की अशक्त आहे, किंवा चंद्र दोष आहे की नाही, या गोष्टी समजतात. तळहात पाहून सर्व गोष्टी जाणून घेऊ शकता. चंद्राचं स्थान जितकं चांगलं असेल तितकं चांगले परिणाम मिळतात.
advertisement
2/5
हस्तरेषाशास्त्रानुसार, चंद्र पर्वतावरील गुलाबी रंग हा चंद्राचे भक्कम अस्थित्व दर्शवितो. हे स्थान म्हणजे परदेश प्रवास, मानसिक स्थिती आणि आजार निश्चित करण्यास मदत करू शकतो. चंद्राची स्थिती एखाद्या व्यक्तीचा अहंकार किंवा आनंद याची माहिती देऊ शकतो.
advertisement
3/5
चंद्र पर्वतावर अनेक रेषा असल्यास व्यक्तीला नाहक भीती वाटू शकते, चिंतेत राहण्याची शक्यता जास्त असते. चंद्र पर्वतावर असलेला तीळ हा भीती किंवा तणाव यासारख्या गंभीर मानसिक आजारांना दर्शवतो. स्वच्छ आणि स्पष्ट चंद्र पर्वत व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली आणि उत्कृष्ट तार्किक क्षमता दर्शवितो. चंद्र पर्वतावर क्रॉस असलेल्या लोकांनी नदी आणि तलाव अशा गोष्टींपासून सावध राहावे, दूर राहावे, कारण बुडण्याचा धोका असतो.
advertisement
4/5
लग्नानंतर अशा लोकांना यश मिळते - चंद्र पर्वतावरून तुम्ही तुमच्या करिअर आणि लग्नाबद्दल देखील जाणून घेऊ शकता. भाग्यरेषा चंद्र पर्वतावरून उगम पावली तर लग्नानंतर व्यक्तीचे भाग्य सुधारते. म्हणजेच अशा लोकांना लग्नानंतर यश मिळते. अशा लोकांना चांगला समजूतदार जीवनसाथी मिळतो, तो प्रत्येक पावलावर साथ देतो. तळहातावर चंद्र पर्वताची स्थिती चांगली असल्यास तुम्हाला अभिनय, कला, पाणी आणि अन्नपुरवठा या क्षेत्रात यश मिळू शकते.
advertisement
5/5
या पर्वतावर लहान रेषा असतील तर प्रेम विवाह होण्याची दाट शक्यता असते. असे लोक आयुष्यात खूप प्रवास करतात. एखादी रेषा चंद्रापासून निघाली असेल आणि भाग्य रेषेशी जोडली गेली असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही परदेशात काम कराल किंवा तुमच्या कुटुंबापासून दूर कुठेतरी स्थायिक व्हाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Hastrekha Shastra: तळहातावर अशा रेषा असणाऱ्यांचे लग्नानंतर अनपेक्षित दिवस पालटतात, प्रचंड पैसा कमावतात