Numerology: मुद्देसूद बोलणं, कामात जबरदस्त कॉन्फिडन्स असणाऱ्या मुलींचा जन्म या 4 तारखांचा असतो; एक गोष्ट फक्त..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: काही मुलींचं बोलणं फार प्रभाव टाकणारं असतं. त्यांच्या बोलण्यात असणारा कॉन्फिडन्स पाहून त्यांना कांऊटर करणं इतकं सोपं काम नसतं. काही मुलींच्या बोलण्या-वागण्यात कमालीचा आत्मविश्वास असतो. आपण करत असलेलं प्रत्येक काम कसं योग्य आहे, हे त्या ठामपणे सांगू शकतात. कामात आत्मविश्वास असणं ही मोठी गोष्ट आहे. ती प्रत्येकाकडे असतेच असे नाही. काही लोक काम खूप चांगले करूनही डावलले जातात, कारण त्यांच्यामध्ये स्वत:विषयी आत्मविश्वासाची कमतरता असू शकते.
advertisement
1/6

आज आपण अंकशास्त्रानुसार मूलांक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 या तारखांना जन्मलेले लोक) असलेल्या मुलींविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
2/6
अंकशास्त्रानुसार, सूर्य हा मूलांक 1 चा अधिपती ग्रह आहे. तो शक्ती, आत्मविश्वास, नेतृत्व आणि उर्जेचे प्रतीक आहे. परिणामी या मूलांकाच्या मुली नैसर्गिकरित्या दृढनिश्चयी, स्वावलंबी आणि ध्येयाभिमुख असतात. या मुलींमध्ये जन्मापासूनच कमालीचा आत्मविश्वास नेतृत्वगुण असतात. या मुली आव्हानांना घाबरत नाहीत, त्यांना ताकदीने तोंड देतात.
advertisement
3/6
मूलां 1 असलेल्या मुलींचा कामातील आत्मविश्वास चांगला असतो. आत्मविश्वासानं कामं केल्यानं त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळत जाते. महत्त्वाकांक्षी असल्यानं या मुली त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. कधीकधी, त्यांचा स्वभाव थोडा हट्टी वाटू शकतो, कारण त्या आपल्या मतांवर आणि निर्णयांमध्ये ठाम असतात. मूलांक असलेल्या मुली प्रचंड कष्ट आणि व्यक्तिमत्त्वाद्वारे कोणत्याही क्षेत्रात स्वतःला वेगळे सिद्ध करतात.
advertisement
4/6
नाती गोती कशी सांभाळतात - मूलांक 1 असलेल्या मुली भावनिकदृष्ट्या मोकळ्या मनाच्या आणि प्रामाणिक असतात. साहजिकच त्या रिलेशनमध्येही प्रामाणिक असतात आणि इतरांकडून आदर आणि समजूतदारपणाची अपेक्षा ठेवतात. त्यांच्यात स्वाभिमानाची तीव्र भावना असते, म्हणून त्यांना कोणी दुर्लक्षित केलेलं आवडत नाही. त्यांना कधीकधी लवकर राग येऊ शकतो, परंतु हा राग लगेच कमीही होतो. त्यांना समोरच्याकडून प्रेम, आदर आणि विश्वास मिळाला तर नात्यात घनिष्ठ राहतात. पण रिलेशनमध्ये त्या आज्ञाधारकाच्या भूमिकेत असू शकतात, कारण नेतृत्व त्यांच्यात स्वाभाविकपणे आलेलं असतं.
advertisement
5/6
मूलांक 1 असलेल्या मुलींमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. या मुली आव्हानांना घाबरत नाहीत, आव्हानांना धैर्याने तोंड देतात. आत्मविश्वास त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरित करतो. महत्त्वाकांक्षी असल्यानं त्या त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. कधीकधी, त्या थोड्या हट्टी वाटू शकतात, कारण त्या आपल्या मतांवर आणि निर्णयांमध्ये ठाम असतात.
advertisement
6/6
मूलांक 1 असलेल्या मुली भावनिकदृष्ट्या मोकळ्या मनाच्या आणि प्रामाणिक असतात. त्या रिलेशनमध्ये प्रामाणिक असतात आणि इतरांकडून आदर आणि समजूतदारपणाची अपेक्षा करतात. त्यांना कोणी दुर्लक्षित केलेलं आवडत नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: मुद्देसूद बोलणं, कामात जबरदस्त कॉन्फिडन्स असणाऱ्या मुलींचा जन्म या 4 तारखांचा असतो; एक गोष्ट फक्त..