TRENDING:

रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी बुधाचा वृश्चिक राशीत प्रवेश! 29 डिसेंबरपर्यंत या राशींच्या धनसंपत्तीत भरभराट होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, व्यवहार, संवाद, व्यापार आणि आर्थिक नियोजनाचा कारक मानले जाते.
advertisement
1/7
बुधाचा वृश्चिक राशीत प्रवेश! 29 डिसेंबरपर्यंत या राशींच्या संपत्तीत भरभराट होणार
वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, व्यवहार, संवाद, व्यापार आणि आर्थिक नियोजनाचा कारक मानले जाते. बुध ग्रह साधारणपणे दर पंधरा दिवसांनी आपली रास बदलतो आणि या काळात तो इतर ग्रहांशी संयोग साधतो. या संयोगांमुळे अनेक शुभ किंवा अशुभ योगांची निर्मिती होते. 6 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला असून तो 29 डिसेंबर 2025 पर्यंत याच राशीत भ्रमण करणार आहे. या काळातील बुधाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
advertisement
2/7
सध्या वृश्चिक राशीत सूर्य आणि शुक्र हे दोन प्रभावशाली ग्रह आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे बुध ग्रह सूर्याबरोबर संयोग साधून ‘बुधादित्य योग’ तर शुक्राबरोबर युती करत ‘लक्ष्मी नारायण योग’ निर्माण करतोय. विशेष म्हणजे एकाच वेळी हे दोन शक्तिशाली राजयोग तयार होत असल्याने या काळाचा प्रभाव अधिक तीव्र असणार आहे. या ग्रहस्थितीचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी काही निवडक राशींसाठी हा काळ नशिबात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो.
advertisement
3/7
या दुहेरी राजयोगामुळे करिअर, उद्योग, आर्थिक स्थिती, मान-सन्मान आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक घडामोडी पाहायला मिळतील. काही राशींच्या लोकांना अचानक संधी मिळण्याची, अडचणी दूर होण्याची आणि प्रगतीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मिथुन, सिंह आणि वृश्चिक या राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे.
advertisement
4/7
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा असल्याने हा दुहेरी राजयोग अधिक लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या सहाव्या भावात बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्यामुळे कामकाजात गती येईल. नोकरी करणाऱ्यांना जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्यातूनच पुढील काळातील उन्नतीचे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत होईल आणि थकीत पैसेही मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणवेल आणि आत्मविश्वास वाढेल.
advertisement
5/7
सिंह रास - सिंह राशीसाठी हा कालखंड सुखसमृद्धी घेऊन येणारा ठरू शकतो. या राशीच्या चौथ्या भावात दुहेरी राजयोग तयार होत असल्याने घरगुती सुखात वाढ होईल. घर खरेदी, वाहनयोग किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय या काळात यशस्वी ठरू शकतात. व्यवसायात नवे करार होतील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मित्रमंडळींचा आधार लाभेल, तसेच समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
वृश्चिक रास -  वृश्चिक राशीतच बुध ग्रह प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे. बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगामुळे करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील आणि विस्ताराचे मार्ग खुले होतील. गुंतवणुकीतून लाभ होण्याची चिन्हे आहेत, विशेषतः शेअर बाजार किंवा दीर्घकालीन योजनांत फायदा संभवतो. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल.
advertisement
7/7
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी बुधाचा वृश्चिक राशीत प्रवेश! 29 डिसेंबरपर्यंत या राशींच्या धनसंपत्तीत भरभराट होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल