TRENDING:

Numerology: हट्टी स्वभावाच्या लोकांचा जन्म या 4 तारखांचा असतो; काही केल्या माघार घेत नाहीत, माझंच खरं..

Last Updated:
Numerology: मूलांक 4 च्या लोकांना समजून घेणे थोडे कठीण जाते, परंतु जे त्यांच्या जवळचे असतात, ते त्यांच्या विश्वासार्हतेची आणि प्रेमाची कदर करतात. जर तुम्ही त्यांचा स्वभाव समजून घेतला आणि त्यांच्या हट्टाला प्रेम आणि समजूतदारपणाने हाताळले, तर त्यांच्यासोबतचे नाते खूप सुंदर आणि दीर्घकाळ टिकतं..
advertisement
1/6
हट्टी स्वभावाच्या लोकांचा जन्म या 4 तारखांचा असतो; काही केल्या माघार घेत नाहीत
अंकशास्त्र कोणत्याही माणसाचा त्याच्या जन्मतारखेवरून स्वभाव सांगू शकतं. जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक जाणून घेता येतो. म्हणजे तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 28 तारखेला झाला असेल, तर (2+8=10) आणि नंतर (1+0=1) म्हणजेच 1 हा तुमचा मूलांक झाला. मूलांकावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीचा मानसिक स्वभाव, वर्तन, आवडी-निवडी, मैत्री, विवाह आणि इच्छांबद्दल सहजपणे माहिती मिळवू शकता.
advertisement
2/6
आज आपण मूलांक 4 च्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक 4 असतो, ते खूप हट्टी आणि आपल्या मतावर ठाम राहणारे असतात. त्यांना समजून घेणे सोपे नसते, कारण ते नेहमी आपल्या म्हणण्यावर अडून राहतात आणि अनेकदा कोणाचे ऐकत नाहीत.
advertisement
3/6
मूलांक 4 च्या लोकांचा स्वभाव - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. त्यांचा स्वामी ग्रह राहू असतो आणि त्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर स्पष्टपणे दिसून येतो. राहूचा प्रभाव त्यांना हट्टी आणि भक्कम करतो. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केसं किंवा एखादे उद्दिष्ट साध्य करण्याचा निश्चय करतात, तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. स्वतःचे मत आणि स्वतःची निवड इतरांकडून मान्य करून घेण्यात ते नेहमीच पुढे असतात.
advertisement
4/6
मूलांक 4 च्या लोकांचे नातेसंबंध - मूलांक 4 असलेले लोक फक्त हट्टी असतात असं नाही, तर भावनिकही असतात. त्यांचे मन खूप मोठे असते आणि ते आपल्या भावनांमध्ये पूर्णपणे बुडालेले असतात. त्यामुळे त्यांचे प्रेम जीवन सहसा खूप चांगले असते. हे लोक आपल्या जोडीदाराप्रति पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठा राखतात. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे आणि भावनांमध्ये लवकर वाहून जाणे यामुळं कधीकधी त्यांच्या रिलेशनमध्ये वाद होतात.
advertisement
5/6
मूलांक 4 च्या लोकांचे व्यक्तिमत्त्व - मूलांक 4 असलेले लोक साहसी आणि आनंदी स्वभावाचेही असतात. ते धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. आव्हानाचा सामना धैर्य आणि उत्साहाने करतात. या लोकांचे खूप मित्र नसतात, पण जे मित्र असतात, त्यांच्यासाठी ते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. मित्रांना मदत करणे आणि अडचणीच्या वेळी कोणालाही एकटे न सोडणे हा त्यांचा स्वभाव आहे.
advertisement
6/6
मूलांक 4 च्या लोकांना समजून घेणे थोडे कठीण आहे, परंतु जे त्यांच्या जवळचे असतात, ते त्यांच्या विश्वासार्हतेची आणि प्रेमाची कदर करतात. जर तुम्ही त्यांचा स्वभाव समजून घेतला आणि त्यांच्या हट्टाला प्रेम आणि समजूतदारपणाने हाताळले, तर त्यांच्यासोबतचे नाते खूप सुंदर आणि दीर्घकाळ टिकते. मूलांक 4 चे लोक खूप हट्टी असतात याचा अर्थ ते वाईट असतात असा नाही, फक्त त्यांना वाटते की त्यांचे विचारच सर्वात योग्य आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: हट्टी स्वभावाच्या लोकांचा जन्म या 4 तारखांचा असतो; काही केल्या माघार घेत नाहीत, माझंच खरं..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल