TRENDING:

ज्याची भीती होती तेच घडणार! या राशींवर येणार मोठी संकटं, पैशांसह वैयक्तिक आयुषात होणार मोठं नुकसान

Last Updated:
Astrology News :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्ष सुरू होण्यासाठी आता फारसा अवधी उरलेला नाही. त्यामुळे नवीन वर्ष आपल्यासाठी कसं ठरणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
advertisement
1/6
ज्याची भीती होती तेच घडणार! या राशींवर येणार मोठी संकटं
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्ष सुरू होण्यासाठी आता फारसा अवधी उरलेला नाही. त्यामुळे नवीन वर्ष आपल्यासाठी कसं ठरणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. नव्या वर्षात ग्रहांच्या हालचालींमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार असून, विशेषतः छाया ग्रह राहू दोन वेळा आपलं संक्रमण करणार आहे. राहूच्या या दुहेरी संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशींवर जाणवेल. मात्र, काही राशींना याचा नकारात्मक फटका बसण्याची शक्यता ज्योतिषांनी व्यक्त केली आहे.
advertisement
2/6
ज्योतिषीय गणनांनुसार राहू ग्रह 2 ऑगस्ट 2026 रोजी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर काही महिन्यांनी, म्हणजेच 5 डिसेंबर 2026 रोजी तो मकर राशीत संक्रमण करणार आहे. सध्या कुंभ राशीत असलेला राहू मकर राशीत प्रवेश करताच अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ होऊ शकते. या दोन्ही संक्रमणांचा एकत्रित परिणाम पाहता तीन राशींसाठी 2026 हे वर्ष विशेष काळजीचं ठरू शकतं. या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे जाणून घेऊया.
advertisement
3/6
वृषभ रास -  2026 मध्ये राहूच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. या वर्षात आर्थिक बाबतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. अचानक खर्च वाढणे, अपेक्षित लाभ न मिळणे किंवा चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. घाईघाईत घेतलेले निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतात. प्रवासाचे योग जरी असले, तरी त्यातून अपेक्षित फायदा मिळेलच असे नाही. त्यामुळे या काळात संयम आणि शहाणपणाने पावलं टाकणं वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक ठरेल.
advertisement
4/6
सिंह रास - सिंह राशीसाठी 2026 मध्ये राहूचे दुहेरी संक्रमण काहीसं त्रासदायक ठरू शकते. या काळात मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळणार नाही, तर काहींच्या हाती आलेल्या संधी निसटू शकतात. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी अडचणी, वरिष्ठांशी मतभेद किंवा कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. घरगुती वातावरणातही वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक बाबतीत नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता असल्याने या काळात कोणतीही नवीन जोखीम घेणं टाळणंच योग्य ठरेल.
advertisement
5/6
कन्या रास - कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचं 2026 मधील संक्रमण विशेष कठीण ठरू शकतं. या काळात अनेक गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे निराशा आणि असंतोष वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवेल आणि करिअरमध्ये विविध आव्हानांचा सामना करावा लागेल. व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. नवीन वर्षाची सुरुवातच जड जाऊ शकते. त्यामुळे या काळात संयम ठेवणं, निर्णय विचारपूर्वक घेणं आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणं कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ज्याची भीती होती तेच घडणार! या राशींवर येणार मोठी संकटं, पैशांसह वैयक्तिक आयुषात होणार मोठं नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल