Samsaptak Yog: आजच ती वेळ आली! मंगळ-गुरुचा शुभ संयोग या राशींवर डिसेंबर एडींगपर्यंत धनवर्षाव करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
December Astrology: आजच दिनांक 7 डिसेंबरच्या रात्री मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. मंगळानं राशी बदलताच गुरू ग्रह आणि मंगळ यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होईल. दोन ग्रह एकमेकांपासून सातव्या घरात असतात तेव्हा समसप्तक योग तयार होतो. मिथुन राशीत गुरू आणि धनु राशीत येणारा मंगळ यांच्यामध्येही असाच योग तयार होत आहे.
advertisement
1/5

मंगळ आणि गुरू हे दोन्ही मित्र मित्र आहेत, त्यामुळं या तयार होणाऱ्या समसप्तक योगाची निर्मिती अतिशय शुभ मानली जात आहे. या शुभ योगाचा फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया.
advertisement
2/5
मेष - समसप्तक योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत अनुकूल परिणाम मिळतील. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. तुम्हाला भावंडांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनपेक्षित फायदे मिळू शकतात. तुमच्या ठरवलेल्या योजना यशस्वी होतील.
advertisement
3/5
सिंह - तुमच्या शिक्षणाच्या घरात मंगळ आणि लाभाच्या घरात गुरुची उपस्थिती तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ ठरू शकते. गुरु-मंगळ समसप्तक योग तुमच्यासाठी नवीन करिअरच्या संधी आणू शकतो. तुम्हाला अचानक एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या गुंतवलेल्या निधीवर तुम्हाला चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यातही सकारात्मक बदल जाणवतील.
advertisement
4/5
कन्या - गुरु-मंगळाचा समसप्तक योग तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. तुमच्या अनेक आर्थिक चिंता दूर होण्याची शक्यता आहे. या राशीच्या काही लोकांना जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्यात यश मिळू शकते. प्रेमसंबंध फुलतील आणि काही जण त्यांच्या प्रेमात असलेल्या जोडीदाराशी लग्न देखील करू शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
5/5
धनु - धनु राशीचा स्वामी गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये निर्माण झालेला समसप्तक योग तुमचे जीवन उन्नत करेल. तुम्हाला अनेक समस्यांवर उपाय सापडू शकतात. कामावर तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्या संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील सापडू शकतात. या योगामुळे तुमचे आरोग्य देखील सुधारेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Samsaptak Yog: आजच ती वेळ आली! मंगळ-गुरुचा शुभ संयोग या राशींवर डिसेंबर एडींगपर्यंत धनवर्षाव करेल