TRENDING:

आता फक्त संकटं आणि त्रास सहन करायचा! या राशींच्या मागे शनि साडेसाती लागणार

Last Updated:
ShaniDev SadeSati : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव हे कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जातात. प्रत्येक ग्रहाप्रमाणे शनीचा राशी परिवर्तनही अत्यंत प्रभावी मानला जातो.
advertisement
1/5
आता फक्त संकटं आणि त्रास सहन करायचा! या राशींच्या मागे शनि साडेसाती लागणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव हे कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जातात. प्रत्येक ग्रहाप्रमाणे शनीचा राशी परिवर्तनही अत्यंत प्रभावी मानला जातो. आता शनी मीन राशीत संक्रमण करणार असून, हा बदल 2026 मध्ये पूर्ण वर्षभर मोठा परिणाम घडवणार आहे. मीन रास ही बृहस्पती (गुरु ग्रह) यांच्या अधिपत्याखाली असल्याने या काळात शनी आणि बृहस्पतीचा एकत्रित प्रभाव जाणवणार आहे. या संक्रमणामुळे काही राशींसाठी नवी संधी आणि प्रगती तर काहींसाठी आत्मपरीक्षण आणि जबाबदारीचा काळ येणार आहे.
advertisement
2/5
शनी मीन राशीत किती काळ राहणार? ज्योतिषशास्त्रानुसार 2026 च्या सुरुवातीला शनी जवळपास तीन आठवडे पूर्वा भाद्रपद नक्षत्रात राहतील. त्यानंतर ते उत्तरा भाद्रपद आणि पुढे रेवती नक्षत्रात प्रवेश करतील. या बदलांच्या मालिकेमुळे अनेक राशींच्या जीवनात उलथापालथ होईल. गुरु ग्रह या काळात मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून प्रवास करणार असल्याने शनी–गुरु यांच्या संयोगाचा दुहेरी प्रभाव दिसून येईल. या काळात साडेसातीचा प्रभाव मेष, कुंभ आणि मीन राशींवर सर्वाधिक जाणवणार आहे.
advertisement
3/5
मेष -  मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं मीन राशीत संक्रमण हे मेहनत, संयम आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही शिकलेले अनुभव आणि सहनशीलता आता तुमचं बलस्थान बनतील. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत ओळखली जाईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल आणि जुने तणाव हळूहळू कमी होतील. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचं मन वळेल. मानसिक शांतता मिळेल आणि जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. मात्र, निर्णय घेताना घाई टाळा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा.
advertisement
4/5
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष नवी जबाबदारी आणि प्रगती घेऊन येईल. शनी आपल्या स्वतःच्या राशीत परिवर्तन करत असल्याने हा काळ मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. कामाच्या ठिकाणी नवी प्रकल्पे किंवा संधी मिळतील. तुम्हाला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. काही वेळा दडपण वाढेल, परंतु तुम्ही तुमच्या शिस्तबद्ध आणि संयमी स्वभावाने प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. कुटुंबात आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. दीर्घकालीन योजनांसाठी हा काळ शुभ आहे. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या.
advertisement
5/5
मीन  - मीन राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती हा आत्मनिरीक्षणाचा आणि जबाबदारी स्विकारण्याचा काळ आहे. या काळात तुमचं लक्ष स्वतःच्या ध्येयांवर केंद्रित राहील. सुरुवातीला काही अडचणी, अडथळे आणि विलंब जाणवतील, पण संयम ठेवा परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल. शिक्षण, संशोधन आणि अध्यात्म या क्षेत्रात प्रगतीची चिन्हं दिसतील. व्यवसायिक निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं उचला. वर्षाच्या मध्यापासून नवे मार्ग खुलतील आणि तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आता फक्त संकटं आणि त्रास सहन करायचा! या राशींच्या मागे शनि साडेसाती लागणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल