TRENDING:

Numerology: दिनांक 5, 14, 23 या बर्थडेट असणाऱ्यांना नवीन वर्ष खास; इतक्या गोष्टींची कमाई एकत्र, पण...

Last Updated:
New Year Horoscope 2026 Mulank 5: नवीन वर्षाची सुरुवात कशी होईल, आयुष्यात कधी, कोणत्या गोष्टी घडतील, आर्थिक बाबी, करिअर ग्रोथ कशी असेल याविषयी सर्वांनी उत्सुकता लागलेली असते. नवीन वर्ष 2026 सुरू होण्यास काहीच दिवस बाकी आहेत. अंकशास्त्रानुसार नवीन 2026 वर्ष कोणासाठी कसे असेल, याचा आढावा घेत आपण चाललो आहोत. आज आपण मूलांक 5 असलेल्या लोकांचे करिअर, आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक स्थिती, प्रेमजीवन इत्यादी कसे राहील, याविषयी जाणून घेऊ?
advertisement
1/8
5, 14, 23 या बर्थडेट असणाऱ्यांना नवीन वर्ष खास; इतक्या गोष्टींची कमाई एकत्र
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला असतो, त्यांचा मूलांक 5 असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक 5 च्या लोकांसाठी 2026 हे नवीन वर्ष कसे असेल.अंक ज्योतिषानुसार, मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे, तो वेगात भ्रमण करतो. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, तर बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. बुध ग्रह आपल्या स्वभावानुसार खूप गतीशील असतो. म्हणजेच नवीन वर्ष 2026 मध्ये मूलांक 5 च्या लोकांना अनेक प्रकारचे प्रवास करावे लागू शकतात. मात्र, अनावश्यक प्रवास करू नका, अन्यथा तुमचा खर्च प्रचंड होईल आणि यश न मिळाल्यास तुम्हाला पश्चात्तापही होऊ शकतो.
advertisement
2/8
करिअरसाठी नवीन वर्ष - मूलांक 5 च्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन वर्ष शानदार असेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील, जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांची प्रगती होईल. तुम्ही तुमच्या कामाचा विस्तार करू शकता कारण वेळ अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या पगारातही वाढ होईल. नोकरीत बदली हवी असल्यास वेळ चांगला आहे.
advertisement
3/8
शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांशी संबधित लोकांसाठी हा संमिश्र काळ राहील. मेहनत करत रहा आणि शिस्तीने अभ्यास करा, तरच लाभ होईल. जे लोक फॅशन, दागिने, सौंदर्य सामग्री, परफ्युम किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे.
advertisement
4/8
योग्य वेळेची प्रतीक्षा करा - नवीन वर्षात मूलांक 5 च्या लोकांना संयम ठेवून काम करावे लागेल. तुम्ही तुमच्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करा आणि त्या वेळी पूर्ण ताकदीने काम करा. यामुळे तुम्हाला यश मिळेल. पण घाईगडबडीत काम कराल तर अपयशाला सामोरे जावे लागेल.
advertisement
5/8
सुख-सुविधांवर पैसा खर्च होईल - मूलांक 5 चे लोक नवीन वर्षात आपल्या सुख-सुविधांवर अधिक पैसा खर्च करू शकतात. तुम्ही तुमच्या घराचे इंटिरिअर बदलू शकता, गॅजेट्स, टीव्ही, फ्रीज किंवा इतर उपकरणे खरेदी करू शकता. यामध्ये तुमचा चांगला पैसा खर्च होईल. नवीन वर्षात नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा योगही येऊ शकतो.
advertisement
6/8
घाईत प्रपोज करू नका - जे लोक प्रेम जीवनात आहेत आणि लव्ह मॅरेज करू इच्छितात, त्यांनी घाईगडबडीत प्रपोज करू नये, अन्यथा काम बिघडू शकते. योग्य वेळ वाटेल, तेव्हा पार्टनरचा मूड ओळखून प्रपोज करा. तुमचे काम नक्की होईल. तुमच्यासाठी सप्टेंबर 2026 नंतर लव्ह मॅरेजचा योग आहे. तसेच, जे लोक प्रेम जीवनाची सुरुवात करणार आहेत, त्यांनीही घाईत प्रपोज करणे टाळावे. योग्य वेळ पाहून प्रपोज केल्यास समोरून 'हो' मध्ये उत्तर मिळेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लव्ह पार्टनर मिळेल.
advertisement
7/8
नात्यांमध्ये चढ-उतार - नवीन वर्षात मूलांक 5 च्या लोकांच्या नात्यांमध्ये चढ-उतार असतील. या लोकांचे आपल्या आई, वडील, भाऊ आणि बहिणीसोबतचे संबंध खराब होण्याची भीती आहे. कोणत्याही विषयावर वादविवादाची परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्यातून बाहेर पडा. त्यात अडकू नका, कारण तुम्ही काहीतरी बोलू शकता, ज्यामुळे गोष्टी जास्त बिघडू शकतात. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, अपशब्द वापरू नका.
advertisement
8/8
रस्ते अपघाताची शक्यता -नवीन वर्षात मूलांक 5 च्या लोकांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन वर्षात रस्ते अपघाताची शक्यता आहे. वाहन चालवताना तुम्हाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे थोडे सतर्क राहण्याची गरज आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: दिनांक 5, 14, 23 या बर्थडेट असणाऱ्यांना नवीन वर्ष खास; इतक्या गोष्टींची कमाई एकत्र, पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल