TRENDING:

रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका! या शुक्रवारी थिएटरमध्ये गाजणार साऊथचे हे 7 सिनेमे

Last Updated:
South Movies Releasing Theaters : 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान साउथ सिनेप्रेमींना एंटरटेनमेंटचा डबल डोस मिळणार आहे. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत.
advertisement
1/7
रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका! या शुक्रवारी थिएटरमध्ये गाजणार साऊथचे हे 7 सिनेमे
संथाना प्रप्तिरस्तु : 'संथाना प्रप्तिरस्तु' हा तेलुगू चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. एका नवविवाहित जोडप्याची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. समाजाच्या दबावाखाली नवविवाहित पत्नीला वडील लवकरात लवकर गर्भधारणा करायला सांगतात आणि 100 दिवसांची मुदत देतात. असं या चित्रपटाचं कथानक आहे. या चित्रपटात रोमान्स, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा संगम पाहायला मिळतो.
advertisement
2/7
कांथा : 'कांथा' हा तामिळ चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दुलकर सलमान अभिनीत कांथा हा चित्रपट या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सेल्वमणी सेल्वराज दिग्दर्शित हा चित्रपट 1950 च्या दशकातील सुपरस्टार टी.के. महादेवन यांच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि अद्वितीय अभिनयाने इंडस्ट्रीत राज्य केले. चित्रपटात दुलकरसोबत भाग्यश्री बोरसे, समुथिरकानी आणि राणा दग्गुबाती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
3/7
लव्ह ओटीपी : 'लव्ह ओटीपी' हा कन्नड-तेलुगू चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय नावाच्या एका तरुण क्रिकेटपटूची कहाणी दाखवली आहे. अनेक हास्यास्पद घटनांदरम्यान तो एकाच वेळी दोन मुलींवर प्रेम करतो आणि दोघींनाही एकमेकींबद्दल काहीच माहिती नसते. दरम्यान त्याचे वडील रोमँटिक नात्यांच्या पूर्णतः विरोधात असतात.
advertisement
4/7
सीमंथम : 'सीमंथम' हा तेलुगू सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गुप्तहेर अभयनंदनची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. जो गर्भवती महिलांना लक्ष्य करणाऱ्या एका सिरीयल क्रिमिनलचा शोध घेत असतो.
advertisement
5/7
अथी भीकरा कामुकन : 'अथी भीकरा कामुकन' हा मल्याळम चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. प्रेयसी अनुच्या लग्नानंतर निराश होऊन आत्महत्या करण्यासाठी डोंगराच्या टोकावर उभा असणाऱ्या एका मुलाचं आयुष्य नंतर पुढे कसं बदलतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्की पाहा.
advertisement
6/7
वलवारा : 'वलवारा' या कन्नड सिनेमात कुंदेशी नामक तरुणाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. संघर्ष करणाऱ्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाचा प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटात कौटुंबिक नात्यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. 14 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
advertisement
7/7
जिग्रिस : जिग्रिस हा सिनेमा 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 'जिग्रिस' या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. प्रवासादरम्यान येणारे अनेक विचित्र, विनोदी आणि रहस्यमय प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या शुक्रवारी मित्रांसोबत तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका! या शुक्रवारी थिएटरमध्ये गाजणार साऊथचे हे 7 सिनेमे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल