Best Psychological Thriller : 'दृश्यम'पेक्षा खतरनाक सस्पेन्स, ट्विस्ट-टर्न्सने भरलेली 7.3 रेटिंगची सायको थ्रिलर, डोक्याला मुंग्या आणणारा क्लायमॅक्स
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Psychological Thriller : तुम्हाला 'दृश्यम'पेक्षाही अधिक खतरनाक आणि सायको थ्रिलर पाहण्याची आवड असेल, तर हा सायको थ्रिलर चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा.
advertisement
1/7

मुंबई: अजय देवगनच्या 'दृश्यम' या चित्रपटाने थ्रिलरची व्याख्या बदलून टाकली आहे. या चित्रपटाचे दोन सीक्वेल आले आणि तिसऱ्याची तयारी सुरू आहे.
advertisement
2/7
पण, तुम्हाला 'दृश्यम'पेक्षाही अधिक खतरनाक आणि सायको थ्रिलर पाहण्याची आवड असेल, तर २०१६ मध्ये आलेला एक चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा.
advertisement
3/7
या चित्रपटात आजचे सुपरस्टार विकी कौशल आणि दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट म्हणजे नुसता ट्विस्ट अँड टर्न्सचा महासागर आहे, जो तुमच्या डोक्याला अक्षरशः मुंग्या आणेल.
advertisement
4/7
या चित्रपटाचे नाव आहे 'रमन राघव 2.0'. अनुराग कश्यप यांनी फक्त ३.५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत होते.
advertisement
5/7
'रमन राघव 2.0' ची स्टोरी तुम्हाला अस्वस्थ करून सोडेल. नवाजुद्दीन सिद्दीकीने यात सीरियल किलर 'रमन' ची भूमिका केली आहे, जो रात्री महिलांचा बलात्कार आणि खून करतो. विकी कौशलने एसीपी राघवनची भूमिका साकारली आहे. राघवन रमनला पकडण्याच्या प्रयत्नात असतो.
advertisement
6/7
रमन स्वतःहून पोलिसांना शरण येतो आणि ९ खून केल्याचे सांगतो. त्यानंतर तो जेलमधून पळून जातो आणि बहिणीसह तिच्या कुटुंबाची हत्या करतो. सिनेमाच्या क्लाइमॅक्समध्ये रमन राघवनला भेटतो आणि म्हणतो की, राघवनही त्याच्यासारखाच सायको आहे.
advertisement
7/7
'रमन राघव 2.0' चा क्लाइमॅक्स अतिशय हैरान करणारा आहे आणि यात अनेक अनपेक्षित वळणे आहेत. या चित्रपटाला IMDb रेटिंग ७.३ आहे, जे त्याची क्वालिटी दर्शवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Best Psychological Thriller : 'दृश्यम'पेक्षा खतरनाक सस्पेन्स, ट्विस्ट-टर्न्सने भरलेली 7.3 रेटिंगची सायको थ्रिलर, डोक्याला मुंग्या आणणारा क्लायमॅक्स