Struggle Story : प्रसिद्ध अभिनेत्याचा इंडस्ट्रीला रामराम, UPSC क्रॅक करत झाला IPS अधिकारी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Actor Cracked UPSC : हिंदी मनोरंजनसृष्टीतील एका अभिनेत्याने अभिनयक्षेत्राला रामराम केला असून त्याने आता UPSC क्रॅक केली आहे. तसेच आता तो IPS अधिकारी झाला आहे.
advertisement
1/7

मनोरंजनसृष्टीत दररोज नवे चेहरे येतात. यातील काही यशस्वी ठरतात तर काही आपली जादू दाखवण्यात कमी पडतात. पण काही असेही असतात जे स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात आणि कायम लक्षात राहतात. अभय डागा हे त्यापैकीच एक नाव आहे. अभयने ग्लॅमरस विश्वाला रामराम करत देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
2/7
अभय डागाने टीव्ही विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण नंतर प्रसिद्धीला दूर करत त्याने आपली नवी दिशा निवडली. त्याने फक्त अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर देशातील सर्वात कठीण परीक्षा UPSC मध्ये 185वी रँक मिळवून IPS अधिकारी बनला आहे. एकंदरीतच त्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला नव्याने घडवले आणि प्रत्येक वेळी नवी उंची गाठली.
advertisement
3/7
अभय डागा सिया के राम या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला. त्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. पण त्याची कहाणी इथेच थांबली नाही. IIT खडगपूर येथून संगणक विज्ञानात पदवी घेतल्यानंतर त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट म्हणून काम केले.
advertisement
4/7
कॉलेजमध्ये असतानाच त्याने थिएटर आणि अभिनयातही आपली छाप पाडायला सुरुवात केली. कॉलेजच्या दिवसांत सुरू झालेला थिएटरचा छंद लवकरच त्याच्या आयुष्याचा जिव्हाळ्याचा भाग बनला. त्याने हे सिद्ध केलं की आवड आणि व्यावसायिक यश हे एकमेकांचे विरोधी नाहीत, तर ते एकत्र चालू शकतात.
advertisement
5/7
अभय 2018 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. जिथे ते भारतातील वाढत्या डिजिटल क्राइमविरुद्ध काम करणाऱ्या सायबर सिक्युरिटी टीमचा भाग होते. तांत्रिक क्षेत्रात यशस्वी करिअर असूनही त्यांच्या मनात राष्ट्रसेवेचे एक नवीन स्वप्न आकार घेत होते. 2021 सालीमध्ये जेव्हा संपूर्ण जग कोराना काळातून जात होते तेव्हा अभयने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी आणि अभिनय दोन्हीपासून दूर राहून सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला सुरुवात केली. हा निर्णय केवळ करिअर बदलण्याचा नव्हता, तर देशासाठी काही मोठे करण्याच्या निर्धाराचा होता.
advertisement
6/7
अभय डागाने आपल्या स्वप्नांची पटकथा स्वतः लिहिली आणि ती साकारही केली. फक्त दोन वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी 2023 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा क्रॅक केली आणि संपूर्ण देशात 185वी रँक मिळवली. अभयने आपल्या आयुष्यात तीन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अभिनेता , तंत्रज्ञानतज्ञ आमि आता सरकारी अधिकारी.
advertisement
7/7
नोव्हेंबर 2024 मध्ये अभयने हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. 2025 मध्ये काम करण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश मिळाला. आज अभय अभिनयापासून दूर असले तरी त्यांचा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Struggle Story : प्रसिद्ध अभिनेत्याचा इंडस्ट्रीला रामराम, UPSC क्रॅक करत झाला IPS अधिकारी