TRENDING:

सलमान नव्हे ऐश्वर्याचा या अभिनेत्रीसोबत 36चा आकडा! एकमेकींचं तोंडही पाहत नाही, नाव ऐकून व्हाल शॉक

Last Updated:
Aishwarya Rai Controversy : ऐश्वर्या राय बच्चन हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण विश्वसुंदरीचा काही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत छत्तीसचा आकडा आहे. एकमेकांसोबत काम करणं सोडा पण ते एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत.
advertisement
1/7
सलमान नव्हे ऐश्वर्याचा या अभिनेत्रीसोबत 36चा आकडा! एकमेकींचं तोंडही पाहत नाही
सलमान खान (Salman Khan) : बॉलिवूडमधील एका लव्हस्टोरीचा काही वर्षांपूर्वीच शेवट झाला आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या काय 'हम दिल दे चुके' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. ऐश्वर्या-सलमानच्या ब्रेकअपमुळे चाहते हैरान झाले होते. ब्रेकअपनंतर ऐश्वर्या आणि सलमान कधीच आमने-सामने आले नाहीत.
advertisement
2/7
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) : ऐश्वर्या राय बच्चन आणि करीना कपूर खान यांच्यात कधीच मैत्री झाली नाही. एकदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्याने करीनाच्या हातून माईक काढून घेतला होता तेव्हापासून त्यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. या घटनेनंतर त्यांनी कधीच एकमेकींसोबत संवाद साधला नाही.
advertisement
3/7
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) : विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या रायचं नातं एकेकाळी खूप चर्चेत होतं. सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या विवेक ओबेरॉयला डेट करायला लागली. पण त्यावेळी विवेकने मीडियाला दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचं नातं तुटलं आणि त्यांच्यात दुरावा आला.
advertisement
4/7
रानी मुखर्जी (Rani Mukherji) : रानी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. पण 'चलते-चलते' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्यात दुरावा आला. या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय पहिली निवड होती. पण नंतर तिला रिप्लेस करुन तिच्या जागी रानी मुखर्जीला घेण्यात आलं. पुढे 'चलते-चलते' हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण ऐश्वर्या आणि रानी मुखर्जी यांचे रस्ते मात्र वेगळे झाले.
advertisement
5/7
इमरान हाशमी (Emraan Hashmi) : ऐश्वर्या राय आणि इमरान हाशमी यांच्यात भांडण होण्यासारखं काही झालेलं नव्हतं. पण एका चॅट शोमध्ये इमरान ऐश्वर्याला 'प्लॅस्टिक' म्हणाला. त्यानंतर नाराज झालेल्या ऐश्वर्याने इमरानसोबत बोलणं बंद केलं.
advertisement
6/7
सुष्मिता सेन (Sushmita Sen) : ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्या 'मिस इंडिया 1994' पासूनच दुरावा आला. मिस इंडिया 1994' सुष्मिता सेन जिंकली आणि ऐश्वर्याने तिच्यासोबत बोलायचं बंद केलं.
advertisement
7/7
सोनम कपूर (Sonam Kapoor) : सोनम कपूर एकदा मीडियासमोर ऐश्वर्या रायला 'आंटी' म्हणाली होती. त्यामुळे ऐश्वर्या खूप नाराज झाली होती. त्यावेळी सोनम आणि ऐश्वर्या लॉरियल ब्रँडसाठी काम करत होत्या. पण या वक्तव्यामुळे सोनम आणि ऐश्वर्याच्या नात्यात मिठाचा खडा पडला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमान नव्हे ऐश्वर्याचा या अभिनेत्रीसोबत 36चा आकडा! एकमेकींचं तोंडही पाहत नाही, नाव ऐकून व्हाल शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल