'औरंगजेब', 'रहमान डकैत' तर फक्त ट्रेलर, नव्या फिल्ममध्ये अक्षय खन्नाने गाठली Next Level! फर्स्ट लूकने घातला धुमाकूळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshaye Khanna Upcoming Film: 'छावा' आणि 'धुरंधर'च्या यशानंतर त्याचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाहत्यांना आणखी एक सरप्राइज देण्यासाठी अक्षय खन्नाने मोठी तयारी केली आहे.
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, जे लांबलचक डायलॉग्स न मारताही केवळ त्यांच्या शांत आणि धारदार नजरेने पडदा गाजवतात. अभिनेता अक्षय खन्ना त्यापैकीच एक!
advertisement
2/9
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटात त्याने साकारलेला 'रहमान डकैत' प्रेक्षकांच्या मनात थेट भीती निर्माण करतो आहे. रणवीर सिंग लीड रोलमध्ये असूनही, 'धुरंधर'ची खरी वाहवा अक्षय खन्ना लुटून नेत आहे.
advertisement
3/9
अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये मुख्य खलनायक रहमान बलोच ऊर्फ रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. कराचीच्या गल्लीगल्लीत दहशत निर्माण करणाऱ्या या क्रूर गँगस्टरच्या पात्रात अक्षय खन्ना इतका खोलवर उतरला आहे की, त्याने ती भूमिका भीषणपणे जिवंत केली आहे.
advertisement
4/9
विशेष म्हणजे, याच वर्षात त्याने विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिकाही साकारून सगळ्यांना थक्क केले होते. या भूमिकेसाठी केलेले त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक त्याला ओळखूही शकले नव्हते.
advertisement
5/9
अक्षय खन्नाच्या संयमित अभिनयाची हीच खरी ताकद आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनीही याच गोष्टीवर जोर दिला आहे. ते म्हणाले "अक्षयच्या अभिनयाने सिद्ध केले की, उत्तम अभिनयासाठी पात्र उथळ किंवा आक्रमक असण्याची गरज नाही. त्याची संयमित तीव्रता प्रत्येक सीनला वजन देते."
advertisement
6/9
'छावा'मधील ऐतिहासिक भूमिका आणि 'धुरंधर'मधील वास्तववादी गँगस्टर साकारल्यानंतर, आता चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अक्षय खन्ना थेट पौराणिक जगात प्रवेश करत आहे.
advertisement
7/9
दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या 'सुपरहिरो-मायथॉलॉजी यूनिव्हर्स'मध्ये अक्षय खन्नाची एन्ट्री होत आहे. प्रशांत वर्माला असा कलाकार हवा होता जो न ओरडताही आपला दरारा निर्माण करू शकेल आणि ज्याच्यात एक अनपेक्षित धोकादायक व्यक्तिमत्त्व असेल. अक्षय खन्नामध्ये हा ऑरा नैसर्गिकपणे आहे.
advertisement
8/9
'महाकाली' चित्रपटातील शुक्राचार्य म्हणून अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. पांढरे झालेले लांब केस, दाढी, डोळ्यांभोवती असलेले काजळ आणि खास कॉस्च्युम यामुळे तो एक आधुनिक पण मूळ भारतीय शुक्राचार्य दिसत आहे.
advertisement
9/9
त्याच्या डोळ्यांतील तीव्रता त्याच्या भूमिकेतील शहाणपण, क्रूरता आणि अनिश्चितता दर्शवते. 'धुरंधर'नंतर 'महाकाली'मधून तो 'पौराणिक' प्रकारात प्रवेश करत असून, प्रेक्षक त्याला एका नव्या रूपात पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'औरंगजेब', 'रहमान डकैत' तर फक्त ट्रेलर, नव्या फिल्ममध्ये अक्षय खन्नाने गाठली Next Level! फर्स्ट लूकने घातला धुमाकूळ