मेहंदी है रचनेवाली! अनुष्काच्या हातावर रंगली मेघनच्या नावाची मेहंदी, पाहा PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Anushka Pimputkar Mehandi : मराठमोळी अभिनेत्री अनुष्का पिम्पुटकरच्या मेहंदीसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अनुष्का पिम्पुटकर आणि अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.
advertisement
2/7
अनुष्का आणि मेघन यांच्या घरी आता सनई चौघडे वाजणार आहेत. 30 ऑक्टोबर 2025 रोजी साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
advertisement
3/7
अनुष्काच्या हातावर आता मेघनच्या नावाची मेहंदी रंगली आहे. तिच्या मेहंदीसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/7
मेहंदीसोहळ्या अनुष्का खूप खुश दिसत आहे. लवकरच अनुष्का आता मेघनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
advertisement
5/7
अनुष्का सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर मेघन जाधवची 'लक्ष्मी निवास' ही मालिका सध्या सुरू आहे.
advertisement
6/7
अनुष्काची नुकतीच बॅचरल पार्टी पार पडली. 'ब्राइड टू बी' असणाऱ्या अनुष्काच्या मित्रांनी तिच्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.
advertisement
7/7
अनुष्का आणि मेघन यांचा मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मेहंदी है रचनेवाली! अनुष्काच्या हातावर रंगली मेघनच्या नावाची मेहंदी, पाहा PHOTO