Arijit Singh Sister: अरिजितपेक्षाही वरचढ आहे त्याची बहीण, आवाज इतका गोड की सगळंच विसरून जाल! कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arijit Singh Sister: अरिजित सिंहची सख्खी बहीण सुद्धा तिच्या भावाप्रमाणेच संगीतावर प्रेम करते आणि तिला हा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिने गायलेली गाणी तुम्ही ऐकली आहेत का?
advertisement
1/11

मुंबई: देशातील सर्वांत पॉप्युलर असलेल्या अरिजित सिंहला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या आवाजातील वेदना, गोडवा आणि साधेपणामुळे अरिजितने भारतीय संगीतविश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे.
advertisement
2/11
मात्र, फार कमी लोकांना अरिजितच्या कुटुंबातील आणखी एका गुणी व्यक्तीबद्दल माहिती आहे, ती म्हणजे त्याची बहीण अमृता सिंह मजुमदार.
advertisement
3/11
२८ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या अरिजितचे बालपण अतिशय साध्या वातावरणात गेले.
advertisement
4/11
अरिजितच्या कुटुंबात संगीताची समृद्ध परंपरा आहे. त्याची आई उत्तम गायिका होती, तर आजी तबला वादक होत्या. याच संगीतमय वातावरणाने अरिजितला लहानपणापासूनच गाण्याशी जोडले.
advertisement
5/11
वयाच्या १८ व्या वर्षी अरिजितने 'फेम गुरुकुल' या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला, मात्र तो जिंकू शकला नाही. यानंतर '१० के १० ले गए दिल' या शोने त्याच्या करिअरला एक नवी दिशा दिली आणि मग त्याने जो इतिहास रचला, तो आज जगासमोर आहे.
advertisement
6/11
अरिजित सिंहची सख्खी बहीण अमृता सिंह मजुमदार हीसुद्धा तिच्या भावाप्रमाणेच संगीतावर प्रेम करते आणि तिला हा वारसा घरातूनच मिळाला आहे.
advertisement
7/11
अमृतासाठीही तिचे पहिले प्रेम गायनच आहे. हिंदी इंडस्ट्रीत तिने अरिजितसारखं मोठं स्थान मिळवलं नसलं तरी, बंगाली चित्रपटसृष्टीत ती एक लोकप्रिय नाव आहे.
advertisement
8/11
बंगाली इंडस्ट्रीतील जवळपास सर्व मोठ्या दिग्दर्शकांसोबत अमृताने काम केले आहे. तिची साधी राहणी आणि गोड आवाज चाहत्यांना खूप आवडतो.
advertisement
9/11
अमृता सिंह मजुमदारने हिंदी चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले आहे. २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर आलेल्या सान्या मल्होत्राच्या 'पगलैट' चित्रपटातील गाणी अमृताने गायली आहेत.
advertisement
10/11
या चित्रपटातील 'फीरे फकीरा' या गाण्याला अरिजित सिंह आणि अमृता सिंह यांनी एकत्रितपणे आवाज दिला होता आणि हे गाणे खूप गाजले. इतकंच नव्हे, तर चित्रपटाचे टायटल ट्रॅक सुद्धा अमृतानेच गायले होते, ज्यात अरिजित आणि रफ्तार यांचा सहभाग होता.
advertisement
11/11
अरिजित सिंह आणि त्याची बहीण अमृता सिंह हे दोघेही आज संगीत क्षेत्रातील दोन गुणी भाऊ-बहीण म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आपल्या मेहनतीने संगीतविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Arijit Singh Sister: अरिजितपेक्षाही वरचढ आहे त्याची बहीण, आवाज इतका गोड की सगळंच विसरून जाल! कोण आहे ती?