TRENDING:

Bigg Boss 19 चा आज ग्रँड फिनाले! या तीन स्पर्धकांना धोका, मराठमोळा प्रणित मोरे कितव्या क्रमांकावर?

Last Updated:
Bigg Boss 19 Grand Finale : 'बिग बॉस 19' या लोकप्रिय कार्यक्रमाचा आज 7 डिसेंबर 2025 रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
advertisement
1/7
Bigg Boss 19 चा आज ग्रँड फिनाले! या तीन स्पर्धकांना धोका, प्रणित मोरेचं काय?
'बिग बॉस 19' या बहुचर्चित कार्यक्रमाचा आज 7 डिसेंबर 2025 रोजी दिमाखदार ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 24 ऑगस्ट 2025 रोजी 18 स्पर्धकांसोबत या सीझनची सुरुवात झाली होती. आता या सीझनला TOP 5 स्पर्धक मिळाले असून कोणाच्या नावे मानाची ट्रॉफी कोरली जाणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस 19' या कार्यक्रमाच्या TOP 5 स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल या पाच स्पर्धकांचा समावेश आहे.
advertisement
3/7
'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजल्यापासून जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. तर रात्री 10:30 वाजल्यापासून कलर्स टीव्हीवर पाहू शकता.
advertisement
4/7
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'च्या विजेत्याला चमकत्या ट्रॉफीसह 50 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. त्यामुळे आता या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
5/7
'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांचे दिमाखदार परफॉर्मेंस, इमोशनल जर्नी व्हिडीओ, स्किट पाहायला मिळणार आहेत. तसेच 'टॉप 5' स्पर्धकांना एक शेवटचा टास्कदेखील देण्यात येणार आहे. फिनालेला चार चांद लावण्यासाठी 'तू मेरी मैं तेरा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेदेखील येणार आहेत.
advertisement
6/7
'बिग बॉस' फॅन पेजच्या वोटिंग ट्रेंडनुसार तान्या मित्तल, अमाल मलिक आणि फरहाना भट्ट या तीन स्पर्धकांना सध्या धोका आहे. 'बिग बॉस 19'च्या ट्रॉफीपासून हे सदस्य दूर आहेत.
advertisement
7/7
'बिग बॉस 19'च्या TOP 2 सदस्यांमध्ये प्रणित मोरे आणि गौरव खन्ना आहेत. विशेष म्हणजे मराठमोळा प्रणित मोरे यात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रणित मोरेला हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांसह संपूर्ण महाराष्ट्रभरातील चाहत्यांचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे कोण होणार या पर्वाचा विजेता हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 चा आज ग्रँड फिनाले! या तीन स्पर्धकांना धोका, मराठमोळा प्रणित मोरे कितव्या क्रमांकावर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल