TRENDING:

स्वतःला 'सर्वांत तरुण करोडपती' म्हणवणारी तान्या मित्तल खरंच श्रीमंत आहे? संपत्तीचा धक्कादायक आकडा आला समोर

Last Updated:
Bigg Boss 19 Finalist Tanya Mittal: तुम्हाला माहीत आहे का, 'सर्वात तरुण करोडपती' असा दावा करणाऱ्या तान्याची एकूण संपत्ती किती आहे आणि ती नेमकी कमाई कशी करते?
advertisement
1/9
स्वतःला 'सर्वांत तरुण करोडपती' म्हणवणारी तान्या मित्तल खरंच श्रीमंत आहे?
मुंबई: 'बिग बॉस १९' च्या घरात आपल्या वादग्रस्त आणि अविश्वसनीय दाव्यांमुळे चर्चेत आलेली तान्या मित्तल सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय बनली आहे. दीडशे बॉडीगार्ड्स सोबत ठेवण्यापासून ते 'फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुंदर' घरात राहण्यापर्यंत, तान्याने आपल्या आलिशान जीवनशैलीचे खूप प्रदर्शन केले आहे.
advertisement
2/9
पण तुम्हाला माहीत आहे का, 'सर्वात तरुण करोडपती' असा दावा करणाऱ्या तान्याची एकूण संपत्ती किती आहे आणि ती नेमकी कमाई कशी करते?
advertisement
3/9
तान्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे अनेक ब्रँड्ससोबत काम करते. इन्स्टाग्रामवर तिचे २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर फेसबुक आणि यूट्यूबवरही तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
advertisement
4/9
ती स्वतःचा 'हँडमेड लव्ह बाय तान्या' नावाचा ब्रँड चालवते. १९ व्या वर्षी तिने सुरू केलेल्या या ब्रँडमधून ती हँडबॅग्स, साड्या आणि इतर लाईफस्टाईल ॲक्सेसरीज विकते. ती अनेक लक्झरी गाड्या, महागड्या डिझायनर साड्या आणि इतर किमती वस्तूंची मालक आहे.
advertisement
5/9
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तान्या मित्तलची एकूण संपत्ती सुमारे २ कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. तर तिची महिन्याची कमाई सुमारे ६ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
advertisement
6/9
तान्याच्या कुटुंबाबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी, तिच्या श्रीमंतीविषयी अनेक दावे केले जातात. काही ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, तान्या ही रवी मित्तल यांची मुलगी आहे. रवी मित्तल हे दिल्लीतील बांधकाम व्यावसायिक असून, त्यांनी दिल्लीत ४०० हून अधिक फ्लॅट्स बांधल्याचे सांगितले जाते.
advertisement
7/9
मात्र, यात गोंधळ आहे. ग्वाल्हेरमधील काही स्थानिक लोक तिच्या वडिलांचे नाव अमित मित्तल असल्याचे सांगतात. तान्याच्या कुटुंबाच्या व्यवसायाबद्दल तिच्या शेजाऱ्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
advertisement
8/9
तान्या मूळची मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील आहे. ती व्यवसायाने आर्किटेक्ट असून, मोटिवेशनल पोस्ट्स, आध्यात्मिक कथा आणि लाईफस्टाईल कंटेंट सोशल मीडियावर शेअर करते.
advertisement
9/9
२०१७ मध्ये तिला 'मिस एशिया टुरिझम २०१८' चा ताज मिळाला होता आणि तिने लेबनॉनमध्ये झालेल्या 'मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स' सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्वतःला 'सर्वांत तरुण करोडपती' म्हणवणारी तान्या मित्तल खरंच श्रीमंत आहे? संपत्तीचा धक्कादायक आकडा आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल