Gaurav Khanna: मित्राने दिला धोका, बाप बनण्यासाठी तरसला! TV च्या सुपरस्टारच्या आयुष्यातील 'या' गोष्टी कोणालाच माहीत नाही
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna: ७ डिसेंबर रोजी या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे. अभिनेता गौरव खन्ना याने 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत बाजी मारली आहे.
advertisement
1/12

७ डिसेंबर रोजी या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे. अभिनेता गौरव खन्ना याने 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत बाजी मारली आहे.
advertisement
2/12
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी करिअरची सुरुवात वेगळ्याच क्षेत्रात केली, पण नशिबाने त्यांना अभिनयाच्या दुनियेत आणले.
advertisement
3/12
असाच एक सुपरस्टार, ज्याने एमबीए करून एका आयटी कंपनीत नोकरी केली, पण एका क्षणात त्याचे आयुष्य बदलले. हा अभिनेता आहे गौरव खन्ना!
advertisement
4/12
गौरव खन्ना केवळ टीव्ही शोमुळेच नाही, तर सध्या 'बिग बॉस १९' च्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळेही चर्चेत आहे. त्याने नुकताच आपल्या आयुष्याचा आणि संघर्षाचा प्रवास बिग बॉसच्या घरात उघड केला.
advertisement
5/12
कानपूरच्या एका व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या गौरवने कधीही अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. त्याचे पूर्ण लक्ष एमबीए पूर्ण करून परदेशात करिअर करण्यावर होते. याच उद्देशाने तो २००३ मध्ये मुंबईत आला, पण नशिबाने वेगळीच योजना आखली होती.
advertisement
6/12
गौरव खन्नाने सांगितले की, त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास केवळ एक योगायोग होता. तो एका मित्राला ऑडिशनसाठी सोबत देण्यासाठी गेला होता. तिथे त्यालाही प्रयत्न करायला सांगितले गेले आणि काय आश्चर्य, तो सिलेक्ट झाला!
advertisement
7/12
त्याला पहिल्या कामासाठी २०,००० रुपये मिळाले. त्या काळात इतकी मोठी रक्कम मिळणे, ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती. तेव्हापासून मुंबईत जगण्यासाठी अभिनयाचे क्षेत्र हा एक प्रॅक्टिकल पर्याय बनला. २००५ मध्ये त्याने टीव्हीवर पदार्पण केले आणि इंडस्ट्रीत हळूहळू आपले स्थान पक्के केले.
advertisement
8/12
अभिनयात यश मिळत असतानाच गौरवच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला. एका जवळच्या मित्राने त्याला महागड्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक केली.
advertisement
9/12
"हा धोका इतका मोठा होता की, माझे जीवन भावनिक, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे थांबले," असे गौरवने भावूक होत सांगितले. पण या अंधाऱ्या काळात त्याची पत्नी आकांक्षा चमोला त्याची सर्वात मोठी ताकद बनली.
advertisement
10/12
२४ नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न झाल्यानंतरच त्याला 'अनुपमा' सारखा हिट शो मिळाला, म्हणून तो आकांक्षाला त्याचा 'लकी चार्म' मानतो.
advertisement
11/12
गौरव खन्ना आणि आकांक्षा यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली असून, त्यांना मूलबाळ नाही. 'बिग बॉस'मध्ये गौरवने एक खासगी गोष्ट सांगितली.
advertisement
12/12
आकांक्षाला सध्या बाळ नको आहे. गौरवला वडील व्हायचे आहे, पण तो पत्नीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो. "मी तिच्यावर खूप प्रेम करतो, म्हणून मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देतो आणि आम्ही सध्या बाळ न करण्याचा निर्णय घेतला आहे," असे गौरवने स्पष्ट केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gaurav Khanna: मित्राने दिला धोका, बाप बनण्यासाठी तरसला! TV च्या सुपरस्टारच्या आयुष्यातील 'या' गोष्टी कोणालाच माहीत नाही