TRENDING:

बिग बॉस 19 संपताच 48 तासांत घडलं भयंकर! फेमस अभिनेत्याचा रस्ते अपघात, कारचा चक्काचूर, PHOTO

Last Updated:
नुकताच बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले पार पडला. ग्रँड फिनालेच्या अवघ्या 48 तासांत एक धक्कादायक माहिती समोर आली. बिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघात झाला आहे.
advertisement
1/7
BB19 संपताच 48 तासांत घडलं भयंकर! फेमस अभिनेत्याचा रस्ते अपघात, कारचा चक्काचूर
बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गौरव खन्ना या सीझनचा विजेता ठरला. बिग बॉस 19 चा फिनाला होऊन 48 तास होत नाहीत तोच एक धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
2/7
बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा भयंकर रस्ते अपघात झाला आहे. या अपघतात त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.
advertisement
3/7
जीशान खान असं अभिनेत्याचं नाव असून तो बिग बॉस OTT मध्ये दिसला होता. कुमकुम भाग्या सारख्या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली होती. 8 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्या कारचा भयंकर अपघात झाला. त्याची कार दुसऱ्या कारवर आदळली आणि कारचा चक्काचूर झाला.
advertisement
4/7
बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार, जीशानचा अपघात रात्री 8.30 वाजताच्या सुमारास झाला. जीशानची काळ्या रंगाची कार एका समोरून येणार्‍या एका ग्रे रंगाच्या कारला धडकली. कार इतक्या जोरानं धडकली की कारमधील एअरबॅग्स ओपन झाल्या. या अपघातानंतर अभिनेता पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. त्यानंतर पुढे काय घडलं याची माहिती समोर आलेली नाही.
advertisement
5/7
जीशानची कुमकुम भाग्य ही मालिका खूप लोकप्रिय होती. आर्यन खन्ना ही भूमिका त्याने साकारली होती. 2019 ते 2021 मध्ये तो एकता कपूरच्या नागिन 6 मध्ये दिसला होता. त्यानंतर लॉकअप आणि बिग बॉस OTT सीझन 1 मध्येही त्याने धम्माल उडवून दिली होती.
advertisement
6/7
करिअरच्या सुरुवातीच्या काळाता त्याने मालिकेत छोटे रोल तसंच म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं. जीशानचं नाव त्याची ऑनस्क्रिन आई रेहाना पंडितबरोबर जोडलं गेलं होतं.
advertisement
7/7
रेहाना आणि जीशान यांचा इन्स्टाग्रामवर लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 2021 ते 2023 या काळात ते रिलेशनमध्ये होते. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर 2024मध्ये त्यांचं पॅचअप झाल्याच्या चर्चा होत्या. रेहाना ही जीशानपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉस 19 संपताच 48 तासांत घडलं भयंकर! फेमस अभिनेत्याचा रस्ते अपघात, कारचा चक्काचूर, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल