मी बिहारची लेक... आमदार झालेल्या मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bihar Election Result 2025 : मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीत 8300 मतांनी विजयी झाली असून वयाच्या 25 व्या वर्षी आमदार झाली आहे. अशातच आता मैथिलीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
1/7

प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून 8300 मतांनी विजयी झाली आहे.
advertisement
2/7
निवडणूक जिंकल्यानंतर मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. PTI सोबत बोलताना मैथिली म्हणाली,"विजयाचा खूप जास्त आनंद आहे. पहिल्या दिवसापासूनच मला कोणत्या गोष्टीचा संशय आला नाही. राजकारणात एवढ्या लवकर एन्ट्री करेल, असा मी कधीच विचार केला नव्हता".
advertisement
3/7
मैथिली म्हणाली,"आता पुढच्या पाच वर्षांसाठी मी सज्ज आहे. मी बिहारची लेक आहे. कारण लोकांनी मला राजकारणी म्हणून न पाहता आपल्या घरची लेक असल्याचा दर्जा दिला आहे. एक संवेदनशील व्यक्ती राजकारणात आपली जागा निर्माण करू शकतो हे मला दाखवायचं आहे.
advertisement
4/7
मैथिली पुढे म्हणाली,"येणाऱ्या दिवसांत मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. ही माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. राजकारणात सक्रीय असले तरी संगीत माझ्यासोबत कायम असणार आहे. संगीताला मी कधीच दूर करणार नाही. आता लोकांसाठी काम करणं हा माझा फुल टाइम जॉब असणार आहे".
advertisement
5/7
मैथिली ठाकूरचा जन्म 25 जुलै 2000 रोजी बिहारमधील बेनीपट्टी येथे झाला आहे. तिने हिंदी, मराठी, उर्दू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, इंग्रजीसह विविध भाषांत गाणी गायली आहेत.
advertisement
6/7
मैथिलीने आपल्या करिअरची सुरुवात 'रायझिंग स्टार' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून केली. या कार्यक्रमात मैथिल अंतिम टप्प्यात पोहोचली होती. पण फक्त दोन मत कमी मिळाल्याने ती उपविजेती ठरली होती.
advertisement
7/7
मैथिली ठाकूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिने गाणं गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मैथिली आता गायन आणि राजकारण अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना दिसून येईल.