TRENDING:

Guess Who : बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता, प्रियंकासोबत होत्या डेटिंगच्या चर्चा; आज गाजवतोय OTT

Last Updated:
Bollywood Flop Actor :बॉलिवूडच्या एका फ्लॉप अभिनेत्याची तुलना ऋतिक रोशनसोबत होत असे. 6 वर्षांत या अभिनेत्याने फक्त 5 चित्रपट दिले. हे सहाही चित्रपट फ्लॉप ठरले होते.
advertisement
1/7
बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता, प्रियंकासोबत होत्या डेटिंगच्या चर्चा; आज गाजवतोय OTT
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मोठ्या अपेक्षांसह चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, पण यश त्यांच्या वाट्याला आले नाही. कोणाला त्यांच्या लुक्ससाठी पसंत केले गेले, तर कोणाची तुलना मोठ्या सेलिब्रिटींसोबत झाली, तरीही ते आपली चमक टिकवू शकले नाहीत. अशाच एका अभिनेत्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, ज्याला तुम्ही कदाचित बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर पाहिले नसेल, कारण आता तो चित्रपटांचा भाग राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी त्याने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू पडद्यामागे गेला.
advertisement
2/7
मोठ्या पडद्यावर फ्लॉप ठरलेल्या या अभिनेत्याला ओटीटीवर जादू दाखवण्यात मात्र यश आले. ओटीटीवर त्याला चांगलीच ओळख मिळाली.
advertisement
3/7
अभिनेता हरमन बावेजा याने 'लव्ह स्टोरी 2025' या चित्रपटाच्या माध्यमातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तो प्रियंका चोप्रासोबत दिसला होता आणि त्यावेळी त्यांच्या नात्याच्या अफवा खूप चर्चेत होत्या. एवढेच नव्हे, त्या काळात हरमन बावेजाची तुलना ऋतिक रोशनशी केली जायची, कारण त्याची डान्सिंग स्टाइल आणि लुक्स ऋतिकसारखे वाटायचे.
advertisement
4/7
13 नोव्हेंबर 1980 रोजी चंदीगड येथे जन्मलेल्या हरमन बावेजाने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. पण त्याला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती आणि अभिनय करायचा होता.
advertisement
5/7
हरमन एका फिल्मी कुटुंबातून येतो, त्यामुळे सिनेमा त्याच्यासाठी नवीन नव्हता. सिने इंडस्ट्रीत काम करण्यासाठी तो नेहमीच सज्ज असे. त्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. शिक्षण घेत असतानाच त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात आधी त्याने आपल्या मामाशी याबद्दल चर्चा केली.
advertisement
6/7
एका मुलाखतीत हरमनने सांगितले होते की, वडिलांशी ही गोष्ट बोलणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. त्याला भीती होती की वडील काय म्हणतील. पण जेव्हा मोठ्या धैर्याने त्याने आपला निर्णय वडिलांना कळवला तेव्हा त्यांनी तत्काळ होकार दिला होता. पण शिक्षण पूर्ण करण्याची अट मात्र वडिलांनी घातली होती. त्यानंतर हरमनने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण सोडले आणि फिल्ममेकिंगचे शिक्षण सुरू केले. पुढे त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्याचे आई-वडील प्रत्येक टप्प्यावर त्याच्या पाठीशी उभे राहिले.
advertisement
7/7
‘लव्ह स्टोरी 2050’ मधून डेब्यू केल्यानंतर हरमन बावेजाने 6 वर्षांत 5 चित्रपट केले, पण सर्वच फ्लॉप ठरले किंवा डिजास्टर ठरले. त्याच्या चित्रपटांच्या यादीत ‘लव्ह स्टोरी 2050’, ‘व्हिक्टरी’, ‘व्हॉट्स युवर राशी?’, ‘डिशकियाऊं’, आणि ‘इट्स माय लाइफ’ यांचा समावेश आहे. सततच्या अपयशामुळे तो हळहळू इंडस्ट्रीपासून दूर जाऊ लागला. चित्रपटांबरोबरच हरमनने अ‍ॅनिमेशन फिल्म ‘चार साहिबजादे’ तयार केली आणि तब्बल 9 वर्षांनंतर 2023 मध्ये आलेल्या ओटीटी सीरीज ‘स्कूप’ मधून दमदार पुनरागमन केले. सध्या तो ओटीटी विश्व गाजवत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता, प्रियंकासोबत होत्या डेटिंगच्या चर्चा; आज गाजवतोय OTT
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल